बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी देखील ती नेहमीच चर्चेत असते. मलायकाचे लाखो चाहते आहेत. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच मलायकाने तिच्या बेडरुममधला एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मलायकाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायका तिच्या बेडरुममध्ये असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत मलायका बेडवर असून आळस देताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर असलेला नवीन वर्षांचा आनंद दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले की ‘शुभ सकाळ २०२२.’ मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : राम चरणसोबतच्या KISS वर समांथाचं मोठं वक्तव्य, सांगितलं लिपलॉकचं सत्य

या आधी मलायकाने बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत ‘मी तुला मिस करते आणि मिस्टर पावटी अर्जुन कपूर (माझं पाउट तुझ्यापेक्षा चांगलं आहे.) नवीन वर्षाच्या शुभेच्छा.’, असे कॅप्शन मलायकाने दिले आहे. मलायकाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली.

आणखी वाचा : लेकीचे केस पांढरे का? दिलीप जोशी म्हणाले…

दरम्यान, अर्जुन कपूर त्याची बहीण अंशुला कपूर, रिया कपूर आणि त्याचा भावोजी करण बूलानी यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर मलायकाची देखील करोना चाचणी करण्यात आली होती. पण तिची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आता अर्जुन, रिया, अंशुला आणि करण बूलानी हे होम क्वारंटाइन आहेत.

Story img Loader