बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती सतत चर्चेत असते. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. यावेळी मलायकाने मुलगा अरहानसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे.

मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मलायका आणि अरहान दोघेही खिडकीतून बाहेर डोकावत असल्याचे दिसत आहे. अरहानने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे आणि मलायकाने गाऊन परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत ‘आम्ही दोघेही एका नवीन प्रवासाला निघालो आहोत. यात एक भीती, उत्साह, अस्वस्थता आणि नवीन अनुभव येणार आहेत… मला एवढच माहित आहे की मला अरहानचा खूप अभिमान आहे. आता आपले पंख पसरवण्याची आणि स्वप्न जगण्याची वेळ आली आहे. मला आता पासूनच तुझी आठवण येते’, अशा आशयाचे कॅप्शन मलायकाने ती पोस्ट शेअर करत दिले आहे.

आणखी वाचा :’माधुरी दीक्षित दे, आम्ही लगेच इथून निघून जाऊ’, पाकिस्तानच्या मागणीला कॅप्टन विक्रम बत्रांनी दिले होते ‘असे’ उत्तर

मलायका आणि अरबाजचा मुलगा अरहान हा पुढच्या शिक्षणासाठी बाहेर जात आहे. एवढंच नाही तर मलायकाने अरहानचा मुंबई विमानतळावरील एक फोटो देखील शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ‘निरोप घेणे खूप कठीण आहे’, अशा आशयाचे कॅप्शन मलायकाने दिले आहे.

malaika arora, malaika arora instagram,
मलायकाने इन्स्टाग्राम स्टोरीवरून हा फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा : याला म्हणतात खरं प्रेम! विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहीत

अरहान पुढच्या शिक्षणासाठी बाहेर जाणार असल्याने मलायका आणि अरबाज एकत्र आले होते. त्यांनी अरहान जाण्याआधी एकदा संपूर्ण कुटुंबासोबत जेवण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मलायकाचे आई-वडील, अमृता अरोरा आणि अरबाज उपस्थित होते.

Story img Loader