बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. ती सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मलायकाचे चालणे पाहून तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
‘इन्स्टा बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम अकाऊंटने मलायकाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका गाडीमधून खाली उतरते आणि तिची बहिण अमृता अरोराच्या घरी जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ जवळपास ४४ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. दरम्यान, मलायका ज्या प्रकारे चालत आहे ते पाहून तिला ट्रोल केले जात आहे.
आणखी वाचा : ‘चिटिंग करणारे…’ ते ट्वीट समांथाशी संबंधित होते का? सिद्धार्थ म्हणाला…
एका यूजरने ‘हिचे चालणे पाहून डोनल्ड डकची आठवणी आली’ असे म्हणत मलायकाला ट्रोल केले जात आहे. दुसऱ्या एका यूजरने ‘ही अशी का चालत आहे’ व्हिडीओ पाहून अशी कमेंट केली आहे.
मलायका अरोराला ही बी-टाऊनमधील सर्वात फिट अभिनेत्रीपैकी एक म्हणून ओळखली जाते. तिला अनेकदा जीमला जाताना स्पॉट करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी तिचा मुंबईतील जीम बाहेरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळीही तिला ट्रोल करण्यात आले होते.