बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या लुक आणि फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मलायकाचा इन्स्टाग्रामवरही बराच मोठा चाहता वर्ग आहे. फक्त तरुण तरुणीच नाही तर मलायकाच्या चाहत्यांमध्ये लहान मुलं देखील आहेत. सध्या मलायकाचा लहान मुलासोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्याची बरीच चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका इव्हेंटमधील मलायकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला मलायका फोटोग्राफर्सना पोझ देताना दिसत आहे. एवढ्यात एक छोटा मुलगा अचानक तिच्यासमोर येतो. यानंतर मलायकानं जे केलं ते सर्वांची मनं जिंकणारं होतं. मलायकानं त्याचा हात हातात घेतला आणि नंतर त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. मलायकाच्या या कृतीनं सर्वांची मनं जिंकली आहेत.

आणखी वाचा- “मला वेड्या कुत्र्याने…” गर्लफ्रेंड अलियाशी लग्न करण्याच्या प्रश्नावर रणबीरची प्रतिक्रिया चर्चेत

या व्हिडीओमध्ये मलायका त्या छोट्या मुलासोबत बोलतानाही दिसत आहे. ती त्याला मजेदार अंदात विचारते, ‘तू माझा डेट आहेस का?’ मलायकाचं बोलणं ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण हसू लागतात. एवढंच नाही तर मलायका त्या मुलाची काळजी देखील करताना दिसली. तो कोणाचा मुलगा आहे? कुठे हरवलेला तर नाही? असंही विचारताना ती दिसली. हा व्हिडीओ व्हिडीओ जर्नलिस्ट विरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

आणखी वाचा- “त्यांच्यासाठी मी बदनाम अभिनेत्री…” विनोद मेहरांच्या आईबाबत रेखा यांनी केला होता खुलासा

मलायकाच्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंटचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. दरम्यान ४८ वर्षीय मलायका आपल्या फिटनेसची खास काळजी घेताना दिसते. त्यामुळे ती सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींना फिटनेसच्या बाबतीत टक्कर देताना दिसते. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी मलायका तिचे योगा आण वर्कआउट व्हिडीओ देखील इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaika arora video with kid goes viral on social media mrj