बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा ही दोघे सोशल मीडियावर कायम चर्चेचा विषय बनलेले असतात. मलायका अरबाज खानपासून वेगळी झाल्यानंतर तिच्या आणि अर्जुन कपूरच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चेला उधाण आलं. याबाबत दोघांनी अजूनतरी काहीच वक्तव्य दिलं नसलं तरी ही दोघे बऱ्याचदा एकत्र दिसतात. अर्जुन आणि मलायकामध्ये असलेल्या वयाच्या अंतरावरून अर्जुनला प्रचंड ट्रोलदेखील केलं जातं. एकूणच दोघांनी त्यांचं खासगी आयुष्य जास्त उघड केलं नसलं तरी सध्या दोघे बऱ्याचदा एकत्र फिरताना, पार्टीला जाताना दिसतात.
नुकताच फॅशन डिझायनर कुणाल रावल आणि अर्पिता यांचा लग्नसोहळा संपन्न झाला. या लग्नाच्या पार्टीत वरुण धवन, शाहिद कपूर, जान्हवी कपूर अशा बड्याबड्या स्टार्सनी हजेरी लावली होती. २८ ऑगस्ट रोजी ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत सगळ्यांनी त्यांच्या कुटुंब आणि मित्र मैत्रिणींबरोबर खूप धमाल केली. या पार्टिच्या थीमनुसार सगळ्यांनी ब्लॅक अँड व्हाईट या रंगाचे कपडे परिधान केले होते.
याच पार्टीतला मलायका अरोराचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मलायका तिच्यावर आणि शाहरुख खानवर चित्रित झालेल्या ‘दिल से’ चित्रपटातल्या ‘छैय्या छैय्या’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिच्यासोबत अर्जुन कपूरदेखील या गाण्यावर नाचताना आपल्याला दिसत आहे. डान्सफ्लोरवरची अर्जुन आणि मलायका यांच्यातली ही केमिस्ट्री लोकांना चांगलीच पसंत पडली आहे. पांढऱ्या लेहंग्यात मलायका ही फारच सुंदर दिसत आहे. तिचा हा लुक तिच्या चाहत्यांनाही प्रचंड आवडला आहे.
अर्जुन कपूर हा त्याच्या अभिनयावरून आणि मलायकाबरोबरच्या अफेअरवरून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत असतो. तर मलायका ही तिच्या हॉट बोल्ड जीम लुकसाठी सर्वात जास्त चर्चेत असते. दरदिवशी जीमला जातानाचे तिचे हॉट अवतारातले फोटोज चांगलेच व्हायरल होत असतात. अर्जुन कपूर हा नुकताच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटातून आपल्याला दिसला. मलायका ही चित्रपटात जरी आपल्याला दिसत नसली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चर्चेत असते.