बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी सुद्धा ती चर्चेत असते. मलायकाचे लाखो चाहते आहेत. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, नुकतीच मलायकाने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
मलायका तिच्या अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपमध्ये चर्चेत आहे. मलायका आणि अर्जुनची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. आता या दोघांमध्ये करोनामुळे अंतर आले आहे. खरतरं अर्जुन कपूर करोना पॉझिटिव्ह आहे आणि मलायकाची करोना चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. त्या कारणामुळे हे दोघे नवीन वर्षांच्या निमित्ताने एकमेकांपासून दूर झाले आहेत.
आणखी वाचा : “अशिक्षित आणि…”, सुधीर मुनगंटीवारांबाबत सोनम कपूरची पोस्ट व्हायरल!
अर्जुन करोनामुळे क्वारंटाईनमध्ये आहे. त्यामुळे मलायका अर्जुनला मीस करत आहे. यावेळी तिने अर्जुनचा आणि तिचा एक जुना फोटो शेअर केला. हा फोटो मलाकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ‘मी तुला मिस करते आणि मिस्टर पावटी अर्जुन कपूर (माझं पाउट तुझ्यापेक्षा चांगलं आहे.) नवीन वर्षाच्या शुभेच्छा.’, असे कॅप्शन मलायकाने दिले आहे. मलायकाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
आणखी वाचा : तैमूरच्या फोटोवर कंगनाची कमेंट पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का, म्हणाले…
दरम्यान, अर्जुन कपूर त्याची बहीण अंशुला कपूर, रिया कपूर आणि त्याचा भावोजी करण बूलानी यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर मलायकाची देखील करोना चाचणी करण्यात आली होती. पण तिची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आता अर्जुन, रिया, अंशुला आणि करण बूलानी हे होम क्वारंटाइन आहेत.