अभिनेता अर्जुन कपूरचा आगामी चित्रपट ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझर प्रदर्शित होताच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टीझर पाहून अनेक चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी देखील अर्जुन कपूरची प्रशंसा केली आहे.

अर्जुनने त्याच्या या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा टीझर पाहून अर्जुनची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री मलायका अरोरा पोस्टवर कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही. तिने कमेन्टमध्ये ‘ऑसम’ (सर्वोत्तम)असे लिहिले. मलायकाने कमेंट करताच ती पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

या चित्रपटाची कथा सत्य घटनांवर आधारित आहे. तसेच अर्जुनने टीझर पोस्ट करत ‘भारतातीय ओसामाचा शोध घेणारी ही अकल्पनीय कथा आहे. या शोध ऑपरेशनमध्ये बंदूकींचा वापरता न करता फक्त हिंमतीचा वापर करण्यात आला आहे,’ असे लिहिले आहे.

मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. तसेच मलायकाने तिच्या खास मित्रमैत्रिणींना मालदीवमध्ये बॅचलर पार्टी दिली असल्याचे म्हटले जात होते. अर्जुन आणि मलायका गोव्यामध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. या लग्नासाठी केवळ त्यांचे निकटवर्तीयच उपस्थित राहणार असून या यादीत करिष्मा, करिना, दीपिका, रणवीर या कलाकारांचा समावेश असल्याचे म्हटले जात होते. परंतु मलायकाने या सर्व चर्चा खोट्या असल्याचे स्पष्ट केले.