गेले कित्येक दिवस मलायका अरोरा खान आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. याबाबत या दोघांनीही अद्याप माध्यमांसमोर कोणताही खुलासा केलेला नाही. पण सोशल मिडियाच्या माध्यमातून मलायका अरोराने यावर आपले मौन सोडले आहे.
अरबाज खानने काही दिवसांपूर्वी चर्चा करणा-यांविरुद्ध राग व्यक्त करत आपल्याला वैयक्तीक आयुष्याबद्दल कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही असे म्हटले होते. त्यानंतर आता मलायकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून सर्वांनाच चपराक लगावली आहे. तिने एक संदेश लिहलेला फोटो टाकला असून, त्यावर म्हटलेय की, मला तुमचे नाक माझ्या आयुष्यात खुपसलेले दिसतेयं.
malaika
मलायका-अरबाज सोबत सोहेल-सीमा यांच्याही घटस्फोटाची चर्चा सध्या बॉलीवूड वर्तुळात आहे. त्यमुळे, सलमानच्या खानदानत नक्की काय चाललंय ते कळायला मार्ग नाही.