मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘मलाइकोट्टई वलीबन’ चित्रपटात ही ‘अप्सरा’ झळकली. मोहनलाल अभिनीत लिजो जोस पेलिसरी दिग्दर्शित ‘मलाइकोट्टई वलीबन’ २५ जानेवारीला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. हा चित्रपट हिंदी, कन्नड, तमीळ व तेलुगू या भाषांमध्येही डब करण्यात आला आहे.

पहिल्या दिवशीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी ‘मलाइकोट्टई वलीबन’च्या कमाईत साधारण ५० टक्के घट झाली. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या अंदाजानुसार, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ५.५ कोटींची कमाई केली होती. परंतु, त्या तुलनेत दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ‘मलाइकोट्टई वलीबन’चे २.७५ कोटी इतकेच भारतीय नेट कलेक्शन नोंदवल गेले. आता या चित्रपटाचे एकूण नेट कलेक्शन ८.४ कोटी इतके आहे.


(Credit- saregamamalayalam/ Instagram)

हेही वाचा… चित्रपटांसाठी कलाकारांना किती मानधन मिळतं? नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितली आकडेवारी, म्हणाला, “कधी ते…”

शुक्रवारी, मल्याळम सिनेमांमध्ये ‘मलाइकोट्टई वलीबन’ ची ऑक्युपेन्सी ३४.८३ टक्के इतकी होती. तर सकाळच्या शो दरम्यान चित्रपटाची ऑक्युपेन्सी २६.८५ टक्के इतकी होती. जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतशी टक्केवारी थोडी वाढत गेली. दुपारच्या शो दरम्यान ही ऑक्युपेन्सी ३७.१३ टक्क्यांपर्यंत वाढली आणि संध्याकाळच्या शो दरम्यान ३८.३६ पर्यंत पोहोचली. रात्रीच्या स्क्रिनिंग दरम्यान ही टक्केवारी थोडी कमी झाली आणि ३६.४८ टक्क्यांवर येऊन पोहोचली. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

हेही वाचा… आवडती अभिनेत्री कोण? विचारल्यावर अशोक सराफांनी घेतलेलं ‘या’ अभिनेत्याचं नाव, वाचा किस्सा

केरळमध्ये, ‘मलाइकोट्टई वलीबन’ने शुक्रवारी २.०२ कोटींची कमाई केली. प्रदर्शनाच्या दिवशी जरी केरळमध्ये ‘मलाइकोट्टई वलीबन’ने ४.७६ कोटी कमावले असले तरी लोकेश कनागराजच्या ‘थलापथी’ आणि विजय अभिनीत ‘लिओ’च्या पहिल्या दिवसाच्या रेकॉर्डला मात करण्यात ‘मलाइकोट्टई वलीबन’ कमी पडला. या दोन्ही चित्रपटांची पहिल्या दिवसाची कमाई १२ कोटी इतकी होती. केरळमध्ये हे कलेक्शन आजपर्यंतचे सर्वाधिक कलेक्शन मानले जाते.

दरम्यान, सोनालीबद्दल सांगायचे झाले, तर तिचा ‘ताराराणी’ हा आगामी चित्रपट २२ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader