Fahadh Faasil Debut In Bollywood : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकार आता बॉलीवूडमध्ये जबरदस्त काम करताना पाहायला मिळत आहेत. विजय देवरकोंडा, रश्मिका मंदाना, तमन्ना भाटिया, समांथा प्रभू हे कलाकार सध्या बॉलीवूडमध्ये अधिक सक्रिय झाले आहेत. आता यामध्ये आणखी एका कलाकाराची भर पडली आहे. मल्याळम इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता फहाद फासिल बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं समोर आलं आहे.
‘आवेशम’ फेम फहाद फासिल ( Fahadh Faasil ) लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. माहितीनुसार, प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली त्यांच्या पुढील प्रोजेक्टसाठी फहाद फासिलला विचारलं आहे. या प्रोजेक्टमध्ये फहादबरोबर ‘अॅनिमल’ चित्रपटात झळकलेली ‘जोया भाभी’ म्हणजेच तृप्ती डिमरी झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
‘पीपिंग मून’च्या वृत्तानुसार, इम्तियाज अली आगामी प्रोजेक्ट फक्त दिग्दर्शित करणार नसून निर्मितीची धुरादेखील सांभाळणार आहेत. यामध्ये तृप्ती डिमरी फहादची हिरोइन असणार आहे. माहितीनुसार, फहाद फासिल ( Fahadh Faasil ) इम्तियाज अली यांच्या प्रोजेक्टमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी खूप उत्सुक आहे. फहादचे बॉलीवूडमधील आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक इम्तियाज आहेत.
गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज अली त्यांच्या या आगामी प्रोजेक्टविषयी चर्चा करत आहे. तसंच प्रोजेक्टबाबत काही करारदेखील झाले आहेत. शिवाय प्रोजेक्टच्या कथेला फायनल टच दिला जात आहे. प्रोडक्शन काम जानेवारीच्या मध्यावर सुरू होणार आहे.
हेही वाचा – श्रद्धा कपूरने जुहूमध्ये भाड्याने घेतलं आलिशान अपार्टमेंट, महिन्याला एक-दोन नव्हे तर ‘इतकं’ लाख भाडं
दरम्यान, फहाद फासिलच्या ( Fahadh Faasil ) कामाबद्दल बोलायचं झालं तर तो अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी कोच्चिच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये अल्लू अर्जुनने फहादच्या कामाचं कौतुक केलं होतं. अल्लू अर्जुन म्हणाला होता, “माझ्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये मी सर्वात चांगल्या मल्याळम अभिनेत्यांपैकी एक फहाद फासिलबरोबर काम केलं आहे.”