अभिनेत्री आंकाक्षा दुबे हिने रविवारी गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या निधनानंतर आणखी एका ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाची माहिती समोर आली आहे. मल्याळम अभिनेते आणि माजी खासदार इनोसंट यांचे निधन झाले आहे. त्यांचं वय ७५ वर्षे होतं. त्यांनी २५ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता अखेरचा श्वास घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे इनोसंट यांना ३ मार्च रोजी कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबेची २५व्या वर्षी आत्महत्या, हॉटेलमध्ये गळफास घेत संपवलं जीवन

इनोसंट यांच्या घशात संसर्ग झाला होता, त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांत त्यांना तीनदा कोरोना झाला होता, त्यामुळे त्याची प्रकृती आणखी खालावली होती. ते कॅन्सर सर्व्हायव्हरही होते. काही वर्षांपूर्वीच त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. मात्र, त्यातून ते बरे झाले, पण त्यांचे शरीर खूपच अशक्त झाले होते.

आकांक्षा दुबेने गळफास घेण्याच्या काही तासांपूर्वीच शेअर केलेली पोस्ट, निधनानंतर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

इनोसंट गेल्या पाच दशकांपासून मल्याळम सिनेसृष्टीत सक्रिय होते. या काळात त्यांनी ७०० हून अधिक चित्रपट केले. ते मल्याळम सिनेमातील सर्वात लोकप्रिय विनोदी कलाकार मानले जात होते. त्यांनी अनेक नकारात्मक भूमिकाही साकारल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.