ज्येष्ठ मल्याळम अभिनेते मामुकोया यांचं निधन झालं आहे. विनोदी भूमिकांसाठी लोकप्रिय असलेले मामुकोया यांनी आज बुधवारी २६ एप्रिल रोजी केरळमधील कोळिकोड येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर मल्याळम चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – कुमार सानूंच्या मुलीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न, अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींचा खुलासा करत म्हणाली…

मामुकोया हे सोमवारी जिल्ह्यातील एका फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनासाठी गेले होते. उद्घाटन करताना ते खाली कोसळले होते, त्यानंतर त्यांना वंदूर येथील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं, तिथून त्यांना कोळिकोड येथील मित्रा रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर रक्तस्त्राव झाला, त्यामुळे बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले, असे वृत्त ‘द न्यूज मिनिट’ने दिले आहे.

हेही वाचा – सानिया मिर्झाशी घटस्फोट घेण्याच्या चर्चांबाबत अखेर शोएब मलिकने सोडलं मौन; म्हणाला, “आम्ही दोघेही…”

मामुकोया यांनी अनेक सुपरहिट मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलंय आणि त्यांच्या अनेक भूमिका खूप गाजल्या होत्या. त्यांच्या काही लोकप्रिय चित्रपटांमध्ये ‘पट्टणप्रवेसम’, ‘नाडोडिक्कट्टू’, ‘श्रीधरांते ओन्नम थिरुमुरिवू’ यांचा समावेश आहे. ‘सुलेखा मंजिल’, ‘फुटेज’, ‘बी निलावरयम शारजाह पल्लियम’, ‘कन्नड टॉकीज’ आणि ‘नॅन्सी रानी’ या चित्रपटातील त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malayalam actor mamukkoya passes away after suffering from heart attack at football ground hrc
Show comments