Actor MLA Mukesh first wife Saritha Allegations : जस्टिस हेमा कमिटीचा (Hema Committee Report) अहवाल प्रदर्शित झाल्यानंतर मल्याळम सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झाले आहेत. या अहवालामुळे सध्या सर्वाधिक यशस्वी असलेल्या या प्रादेशिक सिनेइंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. अभिनेते आणि सीपीआय(एम) आमदार मुकेश (Actor MLA Mukesh) यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आरोपांनंतर मुकेश यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. विरोधी पक्षाने मुद्दा उचलून धरला आहे. यातच मुकेश यांची पहिली पत्नी व ज्येष्ठ अभिनेत्री सरिता यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या आरोपांची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. सोबत असताना मुकेश यांनी भावनिक व शारीरिक शोषण केल्याचा आरोप सरिता यांनी केला होता.
सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”
मुकेश यांनी डान्सर देविकाशी दुसरं लग्न केलं तेव्हा, म्हणजेच साधारण एका दशकापूर्वी सरिता यांनी मुकेश यांच्याबद्दल धक्कादायक खुलासे माध्यमांसमोर केले होते. “मी जे अनुभवलं ते सांगायला मला लाज वाटायची… माझ्यासोबत जे घडत होतं, त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी चित्रपटांमध्ये काम केलंय… मी हे सर्व चित्रपटांमध्ये पाहिलंय… पण माझ्या आयुष्यात हे सर्व घडेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं,” असं त्या ‘मनोरमा ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या.
२० सिनेमे फ्लॉप, १३ वर्षे चित्रपटांपासून दूर; बॉलीवूड अभिनेता तरीही कमावतो बक्कळ पैसे, करतो ‘हे’ काम
अफेअर्स घटस्फोटामागचं मुख्य कारण – सरिता
मुकेश यांची अफेअर्स हे विभक्त होण्यामागे मुख्य कारण होते, असं सरिता यांनी सांगितलं होतं. तसेच कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागला, असंही त्यांनी म्हटलं होतं. “मला बोलायला संकोच वाटत होता. जेव्हा मीडियातील काही लोकांनी मला याबद्दल विचारलं तेव्हा मी सगळं नाकारलं. इतरांना दाखवण्यासाठी ओणम आणि इतर सणांचे आनंदी असल्याचं दाखवणारे फोटो पोस्ट करत राहिलो. त्याचे बरेच अफेअर होते आणि मी या आशेत होते की एकदिवस त्याला त्याची चूक कळेल आणि तो परत येईल,” असं सरिता यांनी सांगितलं होतं.
मुकेश यांच्या वडिलांना दिलेलं वचन पाळलं – सरिता
“माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी मुकेशच्या वडिलांना स्वतःचे वडील मानायचे. त्यांच्यामुळेच मी पोलिसांत तक्रार केली नाही. त्यांना दिलेलं वचन मी ते मरेपर्यंत पाळलं. मुकेशने मोलकरणीसमोर मला मारल्यावर मी त्याच्या घरी जाणं बंद केलं. एकदा त्याचे वडील कामानिमित्त तिरुअनंतपुरमला आले, तेव्हा ते मला घ्यायला आले. त्यांनी मला चलायला सांगितलं. मी नकार दिला आणि पंकज हॉटेलमध्ये रूम घेतली आहे, असं सांगितलं. ड्रायव्हरसमोर ते एक शब्द बोलले नाही, पण नंतर माझ्या खोलीत आले. त्यांनी माझे हात धरले आणि म्हणाले ‘मला माहीत आहे की तुझ्याबरोबर काय घडतंय, माझा मुलगा चुकीचा आहे पण हे माध्यमांसमोर येऊ देऊ नकोस’ त्यांनी विनंती केली आणि ते वचन मी आजपर्यंत पाळले. मात्र मी गप्प होते, यामुळे त्यांना वेगळाच गैरसमज झाला, त्यामुळे मी आज बोलतेय,” असं सरिता म्हणाल्या होत्या. मुकेश यांचे वडील ओ माधवन हे दिग्दर्शक व अभिनेते होते. तसेच ते केरळमधील भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या (CPI) संस्थापक सदस्यांपैकी एक होते.
गरोदर असताना पोटात लाथ मारली – सरिता
“मी गरोदर असताना त्याने माझ्या पोटाला लाथ मारली आणि मी पडले. मी रडले… तो म्हणायचा, ‘अरे.. तू चांगली अभिनेत्री आहेस… रडत राहा.’ तो नेहमी मला त्रास द्यायचा. मी नऊ महिन्यांची गरोदर असताना आम्ही एकत्र जेवायला गेलो होतो . परतत असताना मी गाडीत बसण्याचा प्रयत्न केला असता तो गाडी पुढे-मागे घेऊन मला बसू न देता त्रास देत होता. गाडीच्या मागे पळत असताना मी खाली पडले आणि तिथेच रडत बसले. पण तो मला बघून हसणार हे माहीत असल्याने त्याला माझे अश्रू दिसू नये यासाठी मी प्रयत्न करायचे. एकदा मध्यरात्री तो दारूच्या नशेत आला, तेव्हा मी त्याला उशीर का झाला असं विचारलं. त्याने मला केस पकडून ओढलं, जमिनीवर फरफटत नेलं आणि मारहाण केली,” असं सरिता म्हणाल्या होत्या.
मुकेश दोन्ही पत्नींबद्दल काय म्हणाले होते?
मुकेश यांनी २०२१ मध्ये देविकाला घटस्फोट दिला. २०२३ मध्ये ‘मनोरमा न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सरिता आणि देविका यांच्याबद्दल मनात कोणताही राग नसल्याचं म्हटलं होतं. “आतापर्यंत मी त्यांच्याबद्दल नकारात्मक बोलणं टाळलं. जेव्हा एखादं जोडपं कौटुंबिक न्यायालयात हजर होते, तेव्हा पती-पत्नी नेहमीच एकमेकांना दोष देतात, जवळजवळ १००% प्रकरणांमध्ये असंच घडतं आणि ते स्वाभाविक आहे. पण मी एकदाही त्यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलेलं नाही,” असा दावा त्यांनी केला होता.
“मी दोघींचे मनापासून कौतुक करतो कारण असा निर्णय घेणे आणि त्यात समाधानी असणे हे कौतुकास्पद आहे. आनंदी नसताना नातं टिकवून ठेवून मला त्रास देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी हे चांगलं. तुम्ही तुमच्या पत्नीला, जवळच्या मित्राला किंवा मुलांनाही असे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले नाही तर त्यांच्या आयुष्याचं काय होईल? माझ्या मुलांनाही मी एवढाच सल्ला देतो की त्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या आईला कधीही दुखवू नये,” असं ते म्हणाले होते.
सरिता आणि मुकेश यांचे१९८८ मध्ये लग्न झाले होते, त्यांना दोन मुले आहेत. बराच काळ वेगळे राहिल्यावर २०११ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. नंतर मुकेश यांनी २०१३ मध्ये देविकाशी लग्न केले. ते २०१६ पासून केरळ विधानसभेतील कोल्लम मतदारसंघाचे आमदार आहेत. २०१६ व २०२१ दोन्ही वेळी ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तिकीटावर जिंकून आले.