दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनिका विक्रमनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, हे फोटो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. या फोटोमध्ये अनिकाचे सुजलेले डोळे आणि अंगावर बऱ्याच जखमा दिसत आहेत. नेटकरी सतत अभिनेत्रीला नेमकं काय झालं आहे अशी विचारणा करत आहेत, नेमकं प्रकरण आहे तरी काय जाणून घेऊया.

अनिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केला आहे. याबरोबरच तिच्या या अवस्थेला जबाबदार कोण असल्याचंही तिने सांगितले आहे. अनिकाने पोस्ट मध्ये लिहिले की, तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्याशी असा गैरव्यवहार केला आहे. हा फोटो पाहून अनिकाच्या चाहत्यांची चिंता अधिकच वाढली आहे. सोशल मीडियावर सध्या सगळेच तिच्या बाजूने उभे राहिलेले आपल्याला दिसत आहेत.

akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
school girl and her brother molested by minors who threatened to kill her
जिवे मारण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य, अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा
Kim Kardashian
किम कार्दशियनच्या पायाला गंभीर दुखापत; कुबड्यांचा आधार घेऊन फिरतेय अभिनेत्री, म्हणाली…

आणखी वाचा : सारा, विक्रांत आणि चित्रांगदा एका लिफ्टमध्ये अडकले, अन् केली हटके स्टाईलमध्ये नव्या चित्रपटाची घोषणा

अनिकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिते की, “माझ्या बाबतीत जे काही घडले ते सोडून दिले तरी, मला सतत धमक्यांचे फोन येत आहेत. माझ्या कुटुंबावर चिखलफेक केली जात आहे. दुर्दैवाने, मी अनूप पिल्लई नावाच्या माणसाला डेट करत होते, पण त्याने माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. त्याच्यासारखा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. माझा एवढा छळ करूनही तो मला धमक्या देत आहे. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की तो माझ्याशी असा वागेल.”

याआधीसुद्धा अनिका अनुपबरोबर चेन्नईमध्ये राहत असताना त्याने तिला मारहाण केली होती हेसुद्धा तिने स्पष्ट केलं. तेव्हा त्याने अनिकाची हातापाया पडून माफी मागितली होती. नंतर बेंगलोरमध्ये असताना जेव्हा पुन्हा त्याने अनिकाला मारहाण केली तेव्हा मात्र तिने पोलीसात तक्रार दाखल केली. अनिकाच्या या सोशल मीडिया पोस्टची सगळीकडेच चर्चा होताना दिसत आहे. अनिका विक्रमन ही मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. तिने ‘विशमकरन’, ‘आईकेके’ आणि ‘एंगा पट्टन सोथू’सारख्या चित्रपटात काम केलं आहे.

Story img Loader