मुंबई ते कोची असा विमान प्रवास करताना मल्ल्याळम अभिनेत्री दिव्या प्रभाबरोबर धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीने यासंदर्भात केरळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अभिनेत्री मुंबईहून कोचीला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट एआय ६८१ मधून ९ ऑक्टोबरला प्रवास करत होती. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सहप्रवाशाने प्रवासादरम्यान गैरवर्तणूक केल्याचा आरोप दिव्या प्रभाने केला आहे.
हेही वाचा : “मी फक्त सिनेमापुरत्या गाड्या चालवतो, कारण…”, अभिनय बेर्डेचा खुलासा; म्हणाला, “माझ्या आईने…”
दिव्याने या धक्कादायक घटनेती माहिती सोशल मीडियावर दिली आहे. अभिनेत्री या पोस्टमध्ये लिहिते, “एअर इंडियाच्या विमानात 12C या सीटवर एक प्रवासी मद्यधुंद अवस्थेत बसला होता. काही वेळाने तो 12B या सीटवर येऊन बसला आणि मी 12A या सीटवर बसले होते. थोड्यावेळाने या प्रवाशाने उगाच भांडणं करायला सुरूवात केली. आधी त्याने जागेवरून वाद घातला, त्यांनंतर शारीरिक गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.”
“मी यासंदर्भात एअरहोस्टेसकडे तक्रार करून मदतीची मागणी केली. परंतु, त्यांनी त्या प्रवाशावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही, केवळ त्याला दुसऱ्या जागेवर बसवण्यात आलं. कोची विमानतळावर उतल्यावर मी ही समस्या विमानतळ आणि एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांना सांगितली. त्यांनी तात्काळ कारवाई करत सहप्रवाशाने केलेल्या गैरवर्तनासंदर्भात तक्रार नोंदवली.” असं अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
हेही वाचा : करण जोहरची मोठी घोषणा; ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील ‘या’ गाण्याचे येणार रीमिक्स वर्जन
दिव्या प्रभाने या घटनेची अधिकृत तक्रार स्थानिक पोलिसांकडेही नोंदवली असून या तक्रारीसह विमान प्रवासाची तिकिटं जोडली आहेत. अभिनेत्रीने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी लोकांना तिला पाठिंबा द्यावा अशी विनंती पोस्टद्वारे केली आहे.