मल्याळम अभिनेत्री मालविका श्रीनाथ हिने अलीकडेच तिचा कास्टिंग काउचचा भयानक अनुभव शेअर केला आहे. तीन वर्षांपूर्वी एका चित्रपटात अभिनेत्री मंजू वारियरच्या मुलीच्या भूमिकेसाठी तिला ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. ऑडिशन पूर्ण केल्यानंतर व्हिडीओ रेकॉर्ड करणार्या व्यक्तीने तिला मागून पकडले. तिची आई आणि बहीण बाहेर वाट पाहत होत्या, पण त्या व्यक्तीने तिला १० मिनिटं आत खोलीत थांबण्यास सांगितलं होतं.
एका मल्याळम वाहिनीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मालविकाने सांगितले की, एका चित्रपटासाठी ऑडिशन देत असताना तिला एका खोलीत एका माणसाने अडवले. ती म्हणाली, “मला तीन वर्षांपूर्वी ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. आता मला माहीत झालं की ते त्या चित्रपटाशी संबंधित नव्हते. मला सांगण्यात आलेलं की ते ऑडिशन मंजू वॉरियरच्या चित्रपटासाठी आहे आणि मी मंजूच्या मुलीची भूमिका करणार आहे. मीही आमिषाला बळी पडले आणि तिथे ऑडिशन देण्यास पोहोचले. कारण कोणीतीही व्यक्ती किमान मंजू वॉरियरला भेटता येईल, यासाठी तरी नक्कीच जाईल.”
तब्बू आडनाव का लावत नाही? खुलासा करत म्हणालेली, “मला वडिलांच्या..”
तिची बहीण आणि आई तिच्यासोबत त्रिशूरमध्ये झालेल्या ऑडिशनसाठी सोबत आल्या होत्या. ती पुढे म्हणाली, “ती खोली काचेची होती. ऑडिशननंतर तो म्हणाला माझे केस थोडे विस्कळीत आहेत आणि मला ड्रेसिंग रूममध्ये जाऊन ते ठीक करण्यास सांगितले. मी ते करत असताना अचानक तो आला आणि मला मागून पकडले. तो एक धिप्पाड माणूस होता.”
त्याच्या या कृत्यानंतर मालविका सुन्न झाली आणि थरथरू लागली. “मी त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होते, पण करू शकले नाही. तो म्हणाला, ‘जर तू फक्त तुझ्या मनात विचार केलास तरी पडद्यावर तू मंजू वॉरियरची मुलगी होशील’. त्याने मला माझ्या आई आणि बहिणीला बाहेर थांबू देण्यास सांगत मला तिथे १० मिनिटे थांबवलं. मी रडू लागले आणि त्याचा कॅमेरा खाली पाडण्याचा प्रयत्न केला. त्याचं लक्ष तिकडे जाताच मी खोलीतून निघून गेले,” असा धक्कादायक अनुभव तिने सांगितला.
मालविकाने आतापर्यंत ‘मधुरम’ व ‘सॅटरडे नाइट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लवकरच ती ‘कासारगोल्ड’ चित्रपटात दिसणार आहे.