प्रिया वारियर हे नाव आता सोशल मीडियाला नवीन नाही. मल्याळम अभिनेत्री प्रियाच्या नावाची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाली आणि यासाठी कारण होतं तिच्या आगामी चित्रपटातील व्हायरल झालेला एक व्हिडिओ. नजरेनं घायाळ करणाऱ्या प्रियाची लोकप्रियता फक्त भारतातच नाही तर जरभरात पसरली. ‘विंक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रियाचा आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडिओच्या माध्यमातून ती पुन्हा एकदा तरुणांना घायाळ करताना पाहायला मिळत आहे. एका प्रसिद्ध चॉकलेट ब्रँडच्या जाहिरातीत ती झळकत आहे. क्रिकेटवर आधारित ही जाहिरात आयपीएल IPL सिझन लक्षात घेऊनच चित्रीत करण्यात आला आहे. या जाहिरातीतून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. कारण या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
आलियाच्या आवाजातील ‘राझी’मधील पहिलं गाणं ऐकलंत का?
‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियाचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर तिला एकाच दिवसात सहा लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केलं. इन्स्टाग्रामवर एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स मिळवणारी प्रिया जगभरातील तिसरी सेलिब्रिटी ठरली. त्यानंतर तिने तिच्या अकाऊंटवरून मोठमोठ्या ब्रँडचे प्रमोशनसुद्धा सुरू केलं. अनेक जाहिराती आणि चित्रपटांचे ऑफर्ससुद्धा तिला येऊ लागले. आता प्रियाची ही पहिली जाहिरात सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.