मल्याळम अभिनेत्री रेंजुशा मेनन हिचं निधन झालं आहे. अभिनेत्री राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ३५ वर्षीय रेंजुशाच्या निधनानंतर तिची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहत्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली ३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्री, सुपरहिट चित्रपटांसह मालिकांमध्ये केलंय काम

रेंजुशाने तिच्या मृत्यूच्या काही तास आधी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली होती. व्हिडीओत तिने ‘आनंदा रागम’मधील तिची सह-कलाकार श्रीदेवी अनिलबरोबर एका विनोदी डायलॉगवर लिपसिंक व अभिनय केला होता. तिच्या निधनाची बातमी येताच तिची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल झाली आहे.

रेंजुशाच्या या इन्स्टाग्राम व्हिडीओवर चाहते व सह-कलाकार कमेंट करून श्रद्धांजली वाहत आहेत. तिच्या निधनामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. या घटनेवर विश्वास बसत नसल्याच्या कमेंट्सही त्यांनी केल्या आहेत.

“मी तिच्याइतकी सुंदर नाही पण…”, ‘या’ अभिनेत्रीने साकारावी आपली भूमिका, सुधा मूर्तींची इच्छा

दरम्यान, रेंजुशा केरळमधील थिरवनंतपुरम येथील करियम येथील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली. रेंजुशाच्या पश्चात पती, आई आणि वडील असा परिवार आहे. तिने ‘सिटी ऑफ गॉड’, ‘मेरीकुंडोरू कुंजाडू’, ‘बॉम्बे मार्च’, ‘कार्यस्थान’, ‘वन वे तिकीट’, ‘अथभूता द्विपू’ यासह अनेक टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये काम केलंय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malayalam actress renjusha menon last instagram post viral after death see video hrc