तरुण चित्रपट दिग्दर्शक जोसेफ मनू जेम्सचं २५ फेब्रुवारी रोजी निधन झालं आहे. केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील अलुवा येथील एका खासगी रुग्णालयात त्यांने अखेरचा श्वास घेतला. २६ फेब्रुवारी एर्नाकुलममध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तो ३१ वर्षांचा होता.
मनू जेम्सला न्यूमोनियाचे निदान झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, त्याचा मृत्यू हेपेटायटीसने झाला, असं डॉक्टरांनी सांगितलं. मनू जेम्सचा ‘नॅन्सी रानी’ हा पहिला चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.
‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, मनू जेम्सचं २५ फेब्रुवारी रोजी राजगिरी रुग्णालयात निधन झाले. त्याच्यावर हिपॅटायटीस आजारावर उपचार सुरू होते. २६ फेब्रुवारी रोजी कुराविलगड येथील मेजर आर्चीपिस्कोपल मार्थ मरियम आर्कडेकॉन चर्चमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनू जेम्सच्या अकाली निधनाने मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. ‘नॅन्सी राणी’ या त्याच्या पहिल्या चित्रपटात अहाना कृष्णा आणि अर्जुन अशोकन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट काही दिवसात रिलीज होणार आहे.