Ranjith quits Kerala Chalachita Academy : काही दिवसांपूर्वी बंगाली अभिनेत्री श्रीलेखा मित्राने मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रंजीत यांच्यावर गंभीर आरोप केले. २००९मध्ये दिग्दर्शकाने गैरवर्तन आणि विनयभंग केल्याचा गंभीर आरोप श्रीलेखाने केले होते. त्यामुळेच रंजीत सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या गंभीर आरोपानंतर रंजीत यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी केरळ चलचित्र अकॅडमीच्या (KCA) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा देताना रंजीत यांनी आपली बाजू मांडली आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, रंजीत ( Ranjith ) यांनी गंभीर आरोपांबाबत माध्यमांना एका वॉइस मेसेजच्याद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. बंगाली अभिनेत्रीच्या आरोपांवर रंजीत म्हणाले, “या आरोपांमुळे झालेले नुकसान लवकर भरून काढता येणारे नाही. पण माझ्यावर झालेले आरोप हे चुकीच आहेत, हे मी सिद्ध करेन. तसंच लोकांना समजवेन, या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं सांगेन. हे आरोप कॉन्ट्रडीक्ट्री आहेत. त्यामुळे मी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.”

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Dhananjay Deshmukh On Santosh Deshmukh Case
Dhananjay Deshmukh : “…अन्यथा टॉवरवर चढून मी स्वतः ला संपवून घेणार”, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची संतप्त प्रतिक्रिया
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Image Of PM Narendra Modi.
PM Narendra Modi : “मी देव नाही… माझ्याकडूनही चुका होतात”, पंतप्रधान मोदी पॉडकास्टमध्ये पहिल्यांदाच झळकणार

हेही वाचा – Video: ‘शुभविवाह’ मालिकेतील कलाकारांचा मजेशीर व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर, म्हणाले, “आता आप्पाचा जीव घेता का?”

श्रीलेखा मित्राने लावले आरोप

२२ ऑगस्टला श्रीलेखा मित्राने रंजीत ( Ranjith ) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ती म्हणाली, “ही घटना ‘पलेरी माणिक्यम: ओरु पथिरकोलापथकथानते कथा’ चित्रपटाच्या वेळी घडली होती. मी रंजीत यांना भेटण्यासाठी एका अपार्टमेंटमध्ये गेले होते. तेव्हा ते फोनवर बोलत होते. तिथे खूप लोक होती. रंजीत एका सिनेमॅटोग्राफरबरोबर फोनवर बोलत होते. तेव्हा रंजीत म्हणाले की, जर तू सिनेमॅटोग्राफरबरोबर बोलू इच्छित असशील तर बेडरूममध्ये ये. मग मी बेडरूममध्ये गेले आणि तिथे खूप अंधार होता. तिथे एक बाल्कनी होती.”

पुढे श्रीलेखा म्हणाली, “जेव्हा मी सिनेमॅटोग्राफरबरोबर बोलायला लागली तेव्हा रंजीत माझ्या मागे उभे होते. ते माझ्या बांगड्यांना हात लावू लागले. त्यानंतर मला स्पर्श करण्यास सुरुवात केला. यामुळे मी खूप अस्वस्थ झाले होते. तरीही त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा रंजीत यांना कळालं की मी काहीच रिस्पोन्स देत नाहीये. हात मागे घेत नाही. तेव्हा ते माझ्या मानेला स्पर्श करत केसांबरोबर खेळायला लागले. त्यानंतर मी रंजीतला ढकलून बेडरूम बाहेर पडले.”

हेही वाचा – Video: “गणुल्या माझा दिसतोय छान…”, ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम साईराज केंद्रेचं नवं गाणं प्रदर्शित, पाहा

दरम्यान, गेल्या चार दशकांपासून रंजीत ( Ranjith ) मल्याळम सिनेसृष्टीत काम करत आहेत. २०२१मध्ये CPIM सरकारच्या काळात त्यांना केरळ चलचित्र अकॅडमीचं अध्यक्ष पद देण्यात आलं होतं. आता अशा गंभीर आरोपांनंतर राज्याच्या सांस्कृतिक कार्य मंत्री साजी चेरियन म्हणाले होते, “फक्त आरोपांच्या आधारे त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकत नाही. आम्ही महिलांच्या हितासाठी आहोत. पण कोणतीही कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार असणं गरजेचं असतं. रंजीत यांना अकॅडमीच्या पदावर ठेवायचं की नाही, हे पक्षावर (सीपीआय (एमय)) अवलंबून आहे.” आज रंजीत यांनी स्वतः KCAच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Story img Loader