‘द बॅचलरेट इंडिया- मेरे खयालों की मलिका’ या रिअॅलिटी कार्यक्रमातून जो़डीदार शोधणाऱ्या मल्लिका शेरावतने एका स्पर्धकाचा लग्नाचा प्रस्ताव मान्य केला आहे. या शोदरम्यान कोणतीही पूर्वतयारी न करता स्पर्धकांना मल्लिकाच्या मनावर त्यांची छाप पाडायची होती.त्यावेळी जश्न सिंह याने मल्लिकाचा हात हातात घेऊन अगदी ‘फिल्मी स्टाईल’मध्ये प्रपोज केलं. जश्नच्या प्रपोज करण्याच्या पद्धतीने मल्लिका भलतीच प्रभावित झाली. हा टास्क पूर्ण झाल्यानंतर मल्लिकाच्या या निर्णयामुळे प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला होता.
काही दिवसांपूर्वीच मल्लिकाने मॉडेल-अॅक्टर असलेल्या किरण सागू याच्या गालावर किस केला होता. १५ स्पर्धकांपैकी या स्पर्धकाने मल्लिकाचे लक्ष वेधून घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हा एपिसोड गुरुवारी लाईफ ओके या वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
‘द बॅचलरेट इंडिया- मेरे खयालों की मल्लिका’ हा शो अमेरिकेच्या एका रिअलिटी शोवर आधारित आहे. या शोमध्ये सिंगल बॅचलरेटला १५ स्पर्धक इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात.

Story img Loader