बॉलीवूड चित्रपटांतील बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत प्रेमात पडली आहे. ती सध्या सिरले ऑक्सेनफॅन्स या फ्रेंच उद्योजकासोबत डेटिंग करत आहे. मल्लिकाने नुकतेच आपल्या प्रियकरासोबतचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. प्रेमात पडणे हा जगातील उत्तम अनुभव असतो, असा संदेशही तिने या छायाचित्रासोबत लिहला आहे. मल्लिकाच्या ‘मर्डर’, ‘ख्वाहिश’, ‘प्यार के साईड इफेक्टस’ या चित्रपटांची बॉलीवूडमध्ये चांगलीच चर्चा झाली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तिच्या बॉलीवूडमधील कारकीर्दीला ब्रेक लागला होता. ‘डर्टी पॉलिटिक्स’ या चित्रपटातून ती शेवटची पडद्यावर दिसली होती. आगामी काळात ती लॉस्ट टॉम्ब या हॉलीवूडपटात पहायला मिळणार आहे.

Story img Loader