मल्लिका शेरावत म्हणजे चित्रपटांतील बोल्ड भूमिका , दृश्यं आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या चर्चा हे समीकरण ठरलेलचं. मात्र, भूतकाळातील या सगळ्या गोष्टींना मागे सारत मल्लिका शेरावत ६७व्या कान्स चित्रपट महोत्सवातील रेड कार्पेटवर दिमाखात अवतरली. यापूर्वी सन २००० मध्ये जॅकी चेनबरोबरच्या ‘मिथ’ या चित्रपटाच्या प्रसिद्धासाठी मल्लिकाने कान्सला हजेरी लावली होती. त्यावेळी अवास्तव अंगप्रदर्शन केल्याच्या कारणावरून मल्लिकावर टीका करण्यात आली होती. मात्र, मल्लिकाचा यावर्षीचा पेहराव म्हणजे तिच्या आजवरच्या बोल्ड प्रतिमेला छेद देणारा ठरल्यामुळे मल्लिका शेरावतचे नाव पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांच्या चर्चेत आले आहे. निळ्या रंगातील पोशाख आणि आभुषणांमुळे मल्लिकाच्या वागण्यातील अदब आणि तिच्या चेहऱ्यावरील सौदर्यं आणखीनच खुलून दिसत होते. याबद्दल अनेकजणांकडून कौतूक झाल्यानंतर मल्लिकाने आपल्या पोशाख आणि आभुषणे डिझाईन करणाऱ्यांचे आभार मानले.  ६७व्या कान्स महोत्सवाच्या सोहळ्यात सीआयआय पॅव्हेलियनचे उद्घाटन करण्यासाठी मल्लिका शेरावतला निमंत्रित करण्यात आले होते.

Story img Loader