बॉलीवूड चित्रपटांतील बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत ही लवकरचं विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या सिरले ऑक्सेनफॅन्स या फ्रेंच उद्योजकासोबत ती डेटिंग करत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लिका आणि सिरले हे गेले काही वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या प्रेमाची सर्वांसमोर ग्वाही दिली. मल्लिकाने नुकतेच आपल्या प्रियकरासोबतचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर करत प्रेमात पडणे हा जगातील उत्तम अनुभव असतो, असा संदेशही लिहला होता. इतकेच नाही तर व्हॅलेन्टाइन डेला सिरलेने मल्लिकाला एक आलिशान कार भेटस्वरुपात दिली होती. या दोघांनी आता एक पाऊल पुढे टाकण्याचा विचार केला असून ते लवकरच लग्न करणार असल्याचे कळते.
विवाहबंधनात अडकणार आणखी एक बॉलीवूड अभिनेत्री
या दोघांनी आता एक पाऊल पुढे टाकण्याचा विचार केला आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 22-03-2016 at 11:00 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallika sherawat is getting married soon