बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत फारशी चित्रपटांमध्ये दिसत नसली तरीही सोशल मीडियावर मात्र नेहमीच चर्चेत असते. मल्लिकाचं म्हणणं आहे की, बॉलिवूड इंडस्ट्रीमधील एक भाग असा आहे ज्यातील लोक तिच्या अभिनय कौशल्यावर नाही तर ग्लॅमर आणि बोल्डनेसवर फोकस करतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या करिअरबद्दल बोलतानाच मल्लिकानं २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘मर्डर’ चित्रपटाची तुलना दीपिका पदुकोणच्या ‘गहराइयां’ चित्रपटाशी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मल्लिका शेरावत लवकरच रजत कपूरच्या ‘आरके/आरके’ चित्रपटातून बॉलिवूड कमबॅक करत आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे आणि अशात नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत “दीपिकाने ‘गहराइयां’ चित्रपटात केलेल्या सर्व गोष्टी मी १५ वर्षांपूर्वीच केल्या होत्या.” असं वक्तव्य मल्लिकाने केलं आहे.

या मुलाखतीत मल्लिकाने २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्डर’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. ती म्हणाली, “जेव्हा माझा मर्डर चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा लोकांनी त्यावर टीका केली होती. बिकिनी आणि बोल्डनेसवर लोकांनी टीका केली होती. एवढंच नाही तर लोकांनी मला देखील बरंच काही बोलले. पण आज मला विचारायचं आहे, दीपिकाने ‘गहराइयां’मध्ये केलं ते काय होतं? हे सगळं तर मी १५ वर्षांपूर्वीच केलं होतं. मला या सगळ्यावर एकच सांगायचंय की, लोकांचे विचार फार संकुचित होते.”

आणखी वाचा- Koffee with Karan 7 : “मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये सेक्स…” रणवीरने केला लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा खुलासा

मल्लिका शेरावतनं या मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीवर बरेच गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली, “या इंडस्ट्रीमध्ये काही लोकांनी मला मानसिक त्रास दिला आहे. या लोकांकडे फक्त माझ्या बॉडीवर बोलण्यासाठी वेळ आहे. पण माझ्या अभिनय कौशल्यावर त्यांना बोलायचं नाही. मी ‘मर्डर’ व्यतिरिक्त ‘प्यार के साइड इफेक्ट्स’, ‘दशअवतारम’ आणि ‘वेलकम’ या चित्रपटांमध्येही काम केलंय. पण त्यातील माझा अभिनय कोणीच पाहिला नाही.”