‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ या शोमध्ये येणाऱ्या जवळजवळ सर्व अभिनेत्रींशी जवळीक साधणारा शोचा सूत्रसंचालक कपिल शर्माला खूष होण्याची संधी चालून आली आहे. आपल्या मादक आणि बोल्ड अदाकारीने मोठ्या पडद्यावर आग लावणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत कपिलच्या शोमध्ये येणार आहे. याविषयी माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, मल्लिका शोमध्ये येत असली, तरी ती काही विशेष उद्देशाने येत नाहीये. सध्या तिचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होत नसून, केवळ मजेसाठी म्हणून ती या शोमध्ये येत आहे. आत्तापर्यंत कपिलच्या शोमध्ये सेलिब्रिटीज्, क्रिकेटर्स आणि गायकांनी हजेरी लावली आहे. ‘कलर्स वाहिनी’वरील या शोच्या या आठवड्यातील भागात लेखक चेतन भगत आणि गायक अतिफ अस्लम येणार आहेत. त्याचप्रमाणे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटाने सिनेमागृहात १००० आठवडे पूर्ण केल्याचे सेलिब्रेशन करण्यासाठी ‘डीडीएलजे’मधील शाहरूख खान आणि काजोल ही प्रसिद्ध जोडीदेखील या शोमध्ये हजेरी लावणार आहे.

Story img Loader