बॉलिवूडच्या चित्रपटांतील ‘बोल्ड सीन्स’चा उल्लेख करायचा झाल्यास मल्लिका शेरावतचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. यापूर्वी अनेक चित्रपटांतून अंगप्रदर्शनाचे नवे मापदंड निर्माण करणाऱ्या मल्लिकाने ‘डर्टी पॉलिटिक्स’ या चित्रपटात मात्र ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्याबरोबर बोल्ड सीन्स करताना अवघडल्यासारखे झाल्याचे सांगून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ‘डर्टी पॉलिटिक्स’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत तिने चित्रीकरणावेळीचे आपले अनुभव सांगितले. यावेळी पत्रकारांनी या चित्रपटात ओम पुरी यांच्याबरोबर बोल्ड सीन्स करतानाच्या अनुभवाविषयी विचारले असता, मला त्यांच्यासोबत असे सीन्स करताना नेहमीच अवघडल्यासारखे होत असे, मात्र त्यांनी प्रत्येकवेळी मला सांभाळून घेतल्याचे सांगितले. अशा सीन्समध्ये ओम पुरी यांनी माझे अवघडलेपण दूर करण्यासाठी मदत केल्याचे मल्लिकाने सांगितले.


भनवारी देवी सेक्स स्कँडलवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन के.सी. बोकाडिया यांनी केले असून, ओम पुरी या चित्रपटात एका राजकारण्याची भूमिका साकारत आहेत. तर मल्लिका शेरावतने ‘डर्टी पॉलिटिक्स’मध्ये आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्वत:च्या मादक सौदर्यांचा वापर करणाऱ्या एका महत्वाकांक्षी स्त्रीची भूमिका रंगवली आहे.
ompuri-mallika

vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Shabana Azmi And Nandita Das
“नंदिताने तिचे बोट माझ्या ओठांवर…”, ‘फायर’ चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल शबाना आझमी म्हणाल्या, “ते काही रोमँटिक…”
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Story img Loader