बॉलिवूडच्या चित्रपटांतील ‘बोल्ड सीन्स’चा उल्लेख करायचा झाल्यास मल्लिका शेरावतचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. यापूर्वी अनेक चित्रपटांतून अंगप्रदर्शनाचे नवे मापदंड निर्माण करणाऱ्या मल्लिकाने ‘डर्टी पॉलिटिक्स’ या चित्रपटात मात्र ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्याबरोबर बोल्ड सीन्स करताना अवघडल्यासारखे झाल्याचे सांगून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ‘डर्टी पॉलिटिक्स’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत तिने चित्रीकरणावेळीचे आपले अनुभव सांगितले. यावेळी पत्रकारांनी या चित्रपटात ओम पुरी यांच्याबरोबर बोल्ड सीन्स करतानाच्या अनुभवाविषयी विचारले असता, मला त्यांच्यासोबत असे सीन्स करताना नेहमीच अवघडल्यासारखे होत असे, मात्र त्यांनी प्रत्येकवेळी मला सांभाळून घेतल्याचे सांगितले. अशा सीन्समध्ये ओम पुरी यांनी माझे अवघडलेपण दूर करण्यासाठी मदत केल्याचे मल्लिकाने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा