बॉलीवूडची चर्चित अभिनेत्री मल्लिका शेरावतने नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदीं आज (मंगळवार) आपला ६४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. मागील आठवड्यात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. प्रसारमाध्यमेही त्यांच्या प्रत्येक भेटीकडे आणि वक्तव्याकडे विशेष लक्ष ठेवून आहेत. सोशल मिडियावर मोदी हे ट्रेंडिंग लिस्टमध्ये आघाडीवर असताना त्यांच्या खालोखाल मल्लिका शेरावतने स्थान मिळवले आहे. निमित्त आहे, मल्लिकाने मोदींना एका व्हिडीओ क्लिपद्वारे दिलेल्या वाढदिवासाच्या शुभेच्छांचे. एका वृत्त वाहिनीवर दाखविण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये मल्लिका अगदी सुरात ‘ हॅप्पी बर्थडे नरेंद्र मोदीजी’ गाताना दिसत आहे. मल्लिकाच्या या शुभेच्छा मोदींपर्यंत पोहोचल्या कि नाहीत हे अजून कळलेले नसले तरी सोशल मिडीयावरील या व्हिडीओमुळे वाचकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallika wishes narendra modi on news channel
Show comments