‘द कंप्लीट अॅक्टर’ म्हणून लोकप्रिय असलेले मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांची सध्या चांगलीच चर्चा आहे. ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम २’सारखे चित्रपट दिल्यानंतर मोहनलाल यांच्या आगामी चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रतीक्षा संपली आहे. मोहनलाल यांच्या आगामी ‘रामबाण’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

कोची शहरात सोमवारी चेंबन विनोद जोसे लिखित आणि जोशी दिग्दर्शित ‘रामबाण’ या आगामी मल्याळम चित्रपटाचे मोशन पोस्टर सादर करण्यात आले. या मोशन पोस्टरमध्ये एका व्हीन्टेज कारवर मोहनलाल यांचा एक अॅनिमेटेड अवतार उभा आहे, त्याच्या एका हातात हातोडा आहे आणि दुसऱ्या हातात एके ४७ बंदूक आहे.

Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
lavani dance
“बारक्याने मार्केट गाजवलंय!”, ‘कारभारी दमानं..!’ गाण्यावर चिमुकल्याची ठसकेबाज लावणी! गौतमी पाटीलला देखील टाकले मागे
Mamta Kulkarni
Maha Kumbh 2025 : ममता कुलकर्णी, अनुपम खेरनंतर ‘या’ प्रसिद्ध गायकाची महाकुंभ मेळ्याला हजेरी; शेअर केला खास Video
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…
hemant dhome Kshitee Jog
“माझं आणि क्षितीचं चौथं बाळ…”, नव्या सिनेमासाठी हेमंत ढोमेची खास पोस्ट! प्रेक्षकांना म्हणाला…
Young child in Pune sells dustbin bags
Video : पुण्यात एफसी रोडवर डस्टबिन बॅग विकणाऱ्या आरबाजला आहे इतिहासाची आवड; म्हणाला, “छत्रपती शिवाजी महाराज…’
akshaye khanna will play shahenshah aurangzeb in chhaava movie
डोळ्यात द्वेष, तिरस्काराचा भाव अन्…; ‘छावा’मध्ये औरंगजेबाची भूमिका कोण साकारणार? सिनेमाचं नवीन पोस्टर आलं समोर

आणखी वाचा : ‘गदर २’चं कलेक्शन ते धर्मेंद्र यांचा किसिंग सीन; ‘कॉफी विथ करण’च्या मंचावर सनी व बॉबी देओल करणार बऱ्याच गोष्टींवर भाष्य

यावरूनच हा चित्रपट जबरदस्त अॅक्शननी भरलेला असणार आहे हे स्पष्ट होत आहे. याबरोबरच या पोस्टरमध्ये एका बाजूला शहरातील गरीबी दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला आर्थिक सुबत्ता पाहायला मिळत आहे. त्यामुळे समाजातील विषमतेवरही हा चित्रपट भाष्य करणारा असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

mohanlal
फोटो : इंडियन एक्सप्रेस

मोहनलाल यांनीदेखील हे पोस्टर शेअर करत त्यांच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. पुढील वर्षी म्हणजेच २०२४ च्या मध्यापर्यंत या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल आणि २०२५ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल हेदेखील स्पष्ट झालं आहे. चित्रपटात मोहनलाल यांच्याशिवाय आणखी कोण कोण कलाकार दिसणार आहेत याबद्दल माहिती समोर आलेली नाही. याबरोबरच मोहनलाल लवकरच ‘दृश्यम ३’मध्येही झळकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Story img Loader