‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कॉमेडी शो लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या शोमधल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या शोमधला सगळ्यांचा लाडका ओंकारचा काल वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी त्याच्यावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पण या दरम्यान, सगळ्यात खास ठरलेली पोस्ट म्हणजे, सिंधूताई यांच्या मुलीची पोस्ट. दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांती माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधूताई यांच्या मुलीने ओंकारसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
सिंधुताई यांची लेक ममता सपकाळ यांनी ही पोस्ट त्यांच्य फेसबूक अकाऊंटवरून शेअर केली आहे. यावेळी त्यांनी ओंकारसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी “स्क्रीनवरचा तू, प्रत्यक्षातील तू, तू म्हणजे वेड आहेस. आहे असाच कायम राहा. भरभरून जग.भेटशील तेंव्हा बड्डे पुन्हा सेलिब्रेट करूया.. तोवर आनंदात राहा.. खुश राहा.!” असे कॅप्शन दिले आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/03/mamata-sidhutai-hasya-jatra-omkar-bhojane-1.jpeg?w=294)
आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video
ओंकारचं शिक्षण चिपळूणला झाले आहे. शाळेत असताना तो एकांकिका स्पर्धेत भाग घ्यायचा. २०१८ मध्ये बॉईज २ चित्रपटात त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. कॉमेडी एक्सप्रेस आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या दोन शोनें ओंकारला खरी ओळख दिली. प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेरावसोबतचे त्याचे स्किट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात.