‘अवतार २’ म्हणजेच ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ चित्रपट आता सर्वत्र प्रदर्शित धाला आहे. भारतातही या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे चित्रपट उत्तम कमाई करत असताना दुसरीकडे मात्र एक दुःखद घटना घडली आहे. ‘अवतार २’ चित्रपट चित्रपटगृहामध्ये पाहत असताना एका प्रेक्षकाचं निधन झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : ‘बिग बॉस १६’मधून अब्दू रोजिकची एक्झिट, घरातून बाहेर पडताना ढसाढसा रडला, व्हिडीओ पाहून प्रेक्षक संतापले

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, आंध्रप्रदेशमधील पेड्डापुरम शहरातील चित्रपटगृहामध्ये लक्ष्मीरेड्डी श्रीनू ‘अवतार २’ पाहण्यासाठी पोहोचले. दरम्यान चित्रपट पाहत असतानाच त्यांना हृदय विकाराचा झटका आला असल्याची दुःखद घटना घडली.

चित्रपट पाहत असतानाच ते जागेवर कोसळले आणि चित्रपटगृहामध्येच श्रीनू यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीनू त्यांचे भाऊ राजूसह चित्रपट पाहण्यासाठी आले होते. श्रीनू यांना हृदय विकाराचा झटका आल्यानंतर लगेचच राजू यांनी त्यांना रुग्णालयामध्ये भरती केलं.

आणखी वाचा – Video : दीपिका पदुकोणनंतर सनी लिओनीने परिधान केले भगव्या रंगाचे कपडे, समुद्रकिनारी वाळूत लोळली अन्…

रुग्णालयामध्ये उपचार करण्यापूर्वीच श्रीनू यांचं निधन झालं. त्यांच्या मागे मुलगा व मुलगी असा परिवार आहे. २०१०मध्ये ‘अवतार’चा पहिला भाग प्रदर्शित झाला. यादरम्यान अशीच एक घटना घडली. त्यावेळी एजन्सी फ्रान्स प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार तैवानमध्ये ‘अवतार’चा पहिला भाग पाहत असताना ४२वर्षीय व्यक्तीचं हृदयविकाराच्या आजाराने निधन झालं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man dies in andhra pradesh because of heart attack while watching avatar 2 movie see details kmd