‘कांतारा’ या चित्रपटाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये कोणताच दिग्गज अभिनेता नसताना ‘कांतारा’ सुपरहिट ठरला. चित्रपटाबाबत सकारात्मक चर्चा सुरु असताना एक दुःखद बातमी समोर आली आहे. कर्नाटकमधील एका चित्रपटगृहामध्ये ‘कांतारा’ पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाचं निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी (२४ ऑक्टोबर) ही धक्कादायक घटना घडली.

‘न्यूज १८ डॉट कॉम’च्या वृत्तानुसार राजशेखर असं या मृत प्रेक्षकाचं नाव आहे. सोमवारी कर्नाटक येथील नागमंगला परिसरामध्ये असणाऱ्या व्यंकटेश्वरा चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहण्यासाठी राजशेखर पोहोचले. चित्रपटाचा सकाळचा शो पाहण्यासाठी ते मित्रांबरोबर गेले होते.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!

चित्रपटाचा क्लायमॅक्स सुरु असताना राजशेखर यांच्या छातीमध्ये अचानाक दुखू लागलं. त्यानंतर लगेचच ते चित्रपटगृहाबाहेर आले. मात्र दुखणं अचानक वाढल्याने ते चित्रपटगृहाबाहेरच पडले. तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि चित्रपटगृहाबाहेरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजशेखर यांचं वय ४५ वर्ष होतं.

आणखी वाचा – Ghar Bandook Biryani Teaser : ‘घर बंदूक बिरयानी’चा टीझर प्रदर्शित होताच नागराज मंजुळे यांच्या स्वॅगची होतेय चर्चा, आकाश ठोसरचीही दिसली झलक

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार राजशेखर हे थुरुवेकेरे येथील कुनिकेनहल्ली गावचे राहणारे होते. म्हैसुर येथील खासगी महाविद्यालयामध्ये ते काम करत होते. राजशेखर जेव्हा चित्रपट पाहण्यासाठी घराबाहेर पडले तेव्हा ते एकदम ठिक असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. या प्रकरणासंदर्भात नागमंगला पोलीस ठाण्यात केस दाखल करण्यात आली असल्याचीही माहिती समोर आली आहे.

Story img Loader