‘मन उधाण वाऱ्याचे’ या प्रसिद्ध मालिकेतील गौरी उर्फ नेहा गद्रे नुकतीच विवाहबंधनात अडकली. नेहानं प्रियकर ईशान बापटसोबत विवाहगाठ बांधली. लग्नाचे काही निवडक फोटो नेहानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१० जुलै २०१८मध्ये कुटुंबातील मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत नेहा आणि इशानचा साखरपुडा पार पडला त्यानंतर २ मार्च रोजी ही जोडी विवाहबंधनात अडकली.

पुण्यात हा विवाहसोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी कुटुंबीय, मित्रपरिवार आणि मजोरंजन विश्वातला नेहाचा मित्रपरिवार उपस्थित होता.

‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेतून नेहा घराघरात पोहोचली. तिनं साकारलेली गौरीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. त्यानंतर ‘अजूनही चांद रात आहे ‘ या मालिकेत रेवाची भूमिका तिनं साकारली. ‘मोकळा श्वास’ चित्रपटात मृण्मयी देशपांडेच्या बहिणीच्या भूमिकेत नेहा दिसली होती.