छोट्या पडद्यावरील ‘मन उडू उडू झालं’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण मालिकेतील दीपू आणि इंद्राची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. आता देशपांडे कुटुंबाला सामिका आणि कार्तिकच्या लग्नाची बातमी कळली आहे. त्यामुळे देशपांडे सर हे सानिकावर चिडतात आणि तिला घरातून हाकलून लावतात. मात्र सानिका प्रेग्नंट आहे हे दीपू सांगते त्यावेळी देशपांडे सरांना काय करावं हेच नेमकं सुचत नसतं. या घटनेमुळे सध्या देशपांडे आणि साळगावकर कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण आहे. हा सीन शूट करत असताना सेटवर एक प्रसंग घडला. त्याचा व्हिडीओ सानिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रीना मधुकरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रीनाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. रीनाने शेअर केलेल्या या व्हिडीओत आई म्हणजेच मालतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपलक्ष्मी शिंदे सानिकावर संतापते आणि टेबलावर असलेला ग्लास तिच्यावर फेकते. पण हा सीन शूट करत असताना रुपलक्ष्मीने फेकलेला हा ग्लास रीनाला जोरात पायावर बसतो. यामुळे रीनाला त्रास होतो. पण ग्लाय चुकून लागल्याने रुपलक्ष्मी रीनाकडे धावत जाते आणि तिची चौकशी करत माफी मागते.
आणखी वाचा : एकाच वेळी फणा काढलेल्या तीन सापांसोबत खेळत होता हा मुलगा आणि…; बघा Viral Video
आणखी वाचा : ‘कालचा एपिसोड बघून वाईट वाटलं ना…’, परी आणि मामीचा भन्नाट श्रीवल्ली डान्स पाहिलात का?
हा BTS व्हिडीओ शेअर करत “आई ने केली bowling, उडवला माझा leg stump! अशे stunts वाले scenes करताना, धड धड होतो heart pump! P.S. आई झाली Bumrah”, असे भन्नाट कॅप्शन दिले आहे. रीनाने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सेटवर सीन शूट करताना अशा गंमती होत असतात. कलाकार देखील विसरून पुढे जात काम करत असतात. अनेकांना शूटिंगवेळी दुखापत देखील होते पण कलाकार या सगळ्या गोष्टी मजेशरीपणे त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करतात.