झी मराठीवरील मन उडू उडू झालं ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेने अल्पववधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून येणाऱ्या अनपेक्षित वळणामुळे प्रेक्षकही भारावले आहेत. या मालिकेत देशपांडे कुटुंबात शलाका, सानिका आणि दीपिका या तीन मुली आहेत. या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे ही दीपूची भूमिका साकारत आहे. तर सानिका देशपांडेची भूमिका अभिनेत्री रीना मधुकर साकारते आहे. रीनाने नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
रीना ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. ती सोशल मीडियावर नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. नुकतंच रीनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत रिना ही एका झोक्यावर बसली असून केसात फूल माळले आहे. या फोटोत ती फार गोड दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने याला फार अनोखे कॅप्शन दिले आहे.
“तुम्ही जसे आहात तसेच योग्य आहात. ‘मी अशीच का, मी तशी का नाही’, या तक्रारी न करता स्वत:चं असणं सेलिब्रेट करा. दुसऱ्यांशी तुलना करणं सोप्पं, पण स्वत:चं कौतुक करणं कठीण झालंय का? माझं म्हणणं इतकंच की स्वतःसोबत आनंदी राहा. तुमच्यासारखं जगात दुसरं कोणीच नाही. तुम्ही स्पेशल आहात. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा”, असे रीना म्हणाली.
रीनाच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. त्यासोबत तिच्या अनेक चाहत्यांनी तिला महिला दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहे. रीनाने महिला दिनाच्या निमित्ताने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली होती.
“‘झुंड’ चित्रपट पाहिल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “नागराज मंजुळे हे…”
दरम्यान नुकतंच मन उडू उडू झालं या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये सानिका प्रेग्नेंट असल्याचं समोर आलं आहे. सानिकाने हे सांगितल्यानंतर इंद्रा आणि दीपू ही परिस्थिती कसं हाताळणार, यामुळे त्या दोघांच्या आयुष्यात काही नव्या अडचणी येणार का? याचा त्या दोघांच्या प्रेमावर काय परिणाम होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.