छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेकडे पाहिले जाते. सध्या ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या मालिकेत इंद्रा आणि दिपूची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. पण लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण पार पडले. या मालिकेत कार्तिक साळगावकर ही भूमिका अभिनेता ऋतुराज फडके याने साकारली होती. नुकतंच ऋतुराज फडके याने अभिनेत्री पूर्णिमा तळवळकर हिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री पूर्णिमा तळवलकर यांनी या मालिकेत इंद्रा आणि कार्तिकच्या आईची भूमिका साकारली आहे. ही मालिका संपल्यानंतर नुकतंच कार्तिकने पूर्णिमा यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्यांच्यासोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे. यात ते दोघेही छान बसलेले दिसत असून त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळत आहे.

ऋतुराज फडकेची पोस्ट

“आमच्या सेटवरची सर्वात गोड मुलगी..होणार सून मी ह्या घरची ही मालिका आमच्या घरी रोज बघायचे, त्यात पौर्णिमा ताईने साकारलेली बेबी आत्या म्हणजे अप्रतिम होती, खूप राग यायचा, मी एक समज केला होता, खूप खडूस असणार ही बाई, (त्यात हीचे डोळे घारे,,) आधी मी एक मालिका करत होतो, तेव्हा पण ती एक दोन वेळा सेट वर येऊन गेली, पण कधी बोलण नव्हतं झालं, कारण सुद्धा हेच की मी घाबरायचं हिला.

कालांतराने असा योग आला मन उडू उडू झाल या मालिकेत ती माझी आईची भूमिका करणारा होती, पहिल्या दिवशी जरा घाबरत बोलो, पण ह्या पोरीने पुढच्या दोन ते तीन तासात मला एकदम कम्फर्टेबल करून टाकला.. स्वतःहुन माझ्याशी बोलायला आली, आमच्याबरोबर फोटो काढायला आली…

आणि आज आता असं झालं आहे, ती सेट वर किंव्हा मेकअप रूम मध्ये माझ्या आजूबाजूला ती हवी, सतत तिचा हसतमुख चेहरा दिसायला हवा, नाही दिसला तर कंटाळा यायला लागतो, आता अस झालं आहे की ती माझी खरीच आई वाटायला लागली, रोज आमच्या सगळ्यांसाठी घरातून डबा घेऊन येते, सतत हसतमुख असते, सेट वर कधीच कोणावर चिडलेल मी पाहिलं नाही, आणि आता सध्या ती reel करण्यात बिझी आहे.अशी आहे माझी गोड पूर्णिमा तळवळकर”, असे ऋतुराज फडकेने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान मन उडू उडू झालं या मालिकेच्या जागी आता नवी मालिका प्रसारित होणार आहे. ‘तू चाल पुढं’ असे या नव्या मालिकेचे नाव आहे. ही नवीन मालिका येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.

पाहा व्हिडीओ –

झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचा टीआरपी हा घसरत चालला होता. त्यामुळे आता ‘तू चाल पुढं’ ही मालिका ‘मन उडू उडू झालं’ मालिकेची जागा घेणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man udu udu zhala tv serial kartik salgaonkar fame ruturaj phadke instagram post for purnima talwalkar goes viral nrp