बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरचा ‘बधाई दो’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बधाई दो या चित्रपटात ‘लॅव्हेंडर मॅरेज’ दाखवण्यात आलं आहे. दरम्यान, एका मुलाने त्याचा चित्रपट थिएटर पाहतानाचा त्याचा अनुभव शेअर केला आहे. यावेळी चित्रपट पाहाताना काही प्रेक्षक त्यावर विचित्र कमेंट करत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या नेटकऱ्याने त्याच्या इन्स्टाग्रामवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यावेळी चित्रपट पाहताना प्रेक्षक कशा प्रकारे कमेंट करत होते. या नेटकऱ्याचे नाव प्रियांजुल जोहरी असे आहे. काही प्रेक्षक सतत चित्रपटावर आक्षेपार्ह कमेंट करत असल्याचे बघता प्रियांजुला प्रचंड राग येतो. पण त्याचा जोडीदार शांत राहण्याचा सल्ला देतो, पण शेवटी प्रियांजुल त्या प्रेक्षकांवर संतापला. प्रियांजुलला चित्रपटातील एक सीन प्रचंड आवडला. त्यामुळे तो उभा राहून टाळ्या वाजून लागला. हे पाहता त्याच्या समोर असलेल्या एका व्यक्ती त्याच्यावर कमेंट करत म्हणाला, “हा नक्कीच गे असणार.”

आणखी वाचा : “परत असं घोड्यावर बसायचं नाही”, अमोल कोल्हेंना मिळाली तंबी

यावर प्रियांजुल त्याला सडेतोड उत्तर देत म्हणाला, “हो, मी गे आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? माझ्या पार्टनरसोबत आलो आहे. ४ वर्षांपासून आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. दोघांचे घरी देखील माहित आहे. तुम्हाला काही अडचन आहे का? हे ऐकताच तिथे उपस्थित असलेले सगळे लोक टाळ्या वाजू लागले. एवढंच काय तर एवढ्या लोकांमध्ये त्याने बोलण्याची हिंमत केल्याने त्याचं कौतुक केलं.” प्रियांजुलच्या या पोस्टवर आयुष्यमान खुराना, भूमी पेडणेकर यांनीही कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा : माझ्या हत्येचा कट रचला जातोय; सारेगमप विजेती वैशाली भैसनेची फेसबुक पोस्ट; म्हणाली “आज मला…”

ही पोस्ट शेअर करत, ‘थिएटरमध्ये LGBT+ चित्रपट पाहताना तुम्हालाही काही मनोरंजक/विचित्र/अस्वस्थ वाटलं का?’ यावेळी त्याने शुभ मंगल ज्यादा सावधान, चंडीगढ करे आशिकी, एक लडकी को देखा तो ऐसा लगा या चित्रपटांची नावं कॅप्शनमध्ये दिली आहेत. हे चित्रपट समलैंगिक नात्यावर भाष्य करतात. प्रियांजुलची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तर या पोस्टर आयुष्यमान खुराना, भूमी पेडणेकर यांनी कमेंट केली आहे.

लॅव्हेंडर मॅरेज’ म्हणजे काय? (What’s Lavender Marriage)

जर एखाद्या पुरुषाचा लैंगिक कल स्त्रीपेक्षा पुरुषाकडे जास्त असेल तर त्याला ‘गे’ म्हटले जाते. तसेच जर एखाद्या महिलेचा लैंगिक कल पुरुषांपेक्षा महिलांकडे अधिक असेल तर तिला लेस्बिअन म्हटले जाते. तज्ञांनुसार, जेव्हा एखादा गे मुलगा आणि लेस्बियन मुलगी लग्न करतात, जेणेकरून ते समाज आणि कुटुंबासमोर सामान्य विवाहित जोडप्यासारखे दिसतील, त्याला ‘लॅव्हेंडर मॅरेज’ म्हणतात. असे म्हटले जाते की लॅव्हेंडर रंग समलैंगिकतेशी संबंधित आहे म्हणून या विवाहाला लॅव्हेंडर मॅरेज म्हणतात.

आणखी वाचा : “दीपिका पदुकोणचा ‘गहराइयां’ चित्रपट हा सॉफ्ट पॉर्न अन्…”, अभिनेत्याने केली टीका

समाजातील मान-प्रतिष्ठा वाचवण्यासाठी, टोमणे टाळण्यासाठी आणि लैंगिक आवडीनिवडी लपवण्यासाठी अशा प्रकारचे लग्न केले जाते. जेणेकरुन समाज व कुटुंबीयांकडून त्यांना लग्न न केल्यामुळे कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये. ‘बधाई दो’ या चित्रपटातही सुमन आणि शार्दूल अशाप्रकारे लग्न करतात आणि सामान्य रूम मेट सारखे राहतात.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man watching badhaai do with his gay partner shuts down who were commenting on him dcp