मराठी अभिनेत्री मानसी नाईक मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. मानसी नाईकने काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट शेअर केली होती ज्यामुळे तिच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचं बोललं जात आहे. मानसी नाईकचं मागच्याच वर्षी प्रदिप खरेराशी लग्न झालं होतं. पण काही दिवसांपूर्वीच तिने ‘वाईट बातमी- कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत टिकत नाही, चांगली बातमी- कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत टिकत नाही’ अशा आशयाची पोस्ट केली होती. त्यानंतर आता मानसी नाईकची आणखी एक पोस्ट चर्चेत आली आहे.

मानसी नाईक सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. मानसी नाईकच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा तिच्या वैवाहिक आयुष्यातील वादाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मानसी नाईक आणि तिच्या पतीमध्ये वाद सुरू असल्याचं बोललं जात आहे.

Chandrakant Patil demand to Deputy Chief Minister Eknath Shinde regarding the traffic congestion problem Pune news
अजित पवारांपाठोपाठ चंद्रकांतदादा भेटले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली ही मागणी !
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Image Of Devendra Fadnavis And Eknath Shinde
Devendra Fadnavis : “आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत”, ठाकरेंच्या खासदाराचे शिंदे-फडणवीस यांच्याबाबत खळबळजनक दावे
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
yamuna revier
यमुनेच्या पाण्यावरून वादाचे तरंग; केजरीवाल यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”

आणखी वाचा- …जेव्हा भाजपा आमदार महेश लांडगे “बाई वाड्यावर या…” गाण्यावर अभिनेत्री मानसी नाईक सोबत ठेका धरतात!

मानसीने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिच्या पाळीव मांजरीबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती मांजरीबरोबर खेळताना दिसत आहे. मानसीने हा व्हिडीओ शेअर करताना “समझदारी जिंदगी को बेरंग कर देती है… धन्यवाद” या पोस्टबरोबर तिने #Universe हा हॅशटॅग वापरला आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला ‘प्रेम में तोहरे…’ हे ‘बेगम जान’ चित्रपटातील गाणं वाजताना ऐकू येत आहे. एकंदर दुःखी आशयाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आणखी वाचा-“शिव ठाकरेला माफ करणं, ही माझी चूक होती”

दरम्यान, मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते पण आता दोघांनीही इन्स्टाग्रामवरून त्यांनी एकमेकांबरोबरचे फोटो डिलिट केले आहेत. त्यामुळे दोघांच्याही नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Story img Loader