आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. सध्या ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसी नाईक ही लवकरच तिचा पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच मानसीने घटस्फोटासाठी अर्ज दिल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ती सातत्याने चर्चेत आहे. घटस्फोटांच्या या वृत्तादरम्यान मानसी नाईकने प्रदीप खरेरावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. त्यावर आता प्रदीप खरेराने सडेतोड उत्तर दिले आहे.

मानसी नाईकने काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैवाहिक आयुष्यावर भाष्य करत पती प्रदीप खरेरावर गंभीर आरोप केले आहेत. “काही लोक फक्त पैसे व प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोकप्रिय व्यक्तींशी संबंध जोडतात. जोपर्यंत त्यांच्याकडून पैसे मिळत आहेत, तोपर्यंत त्यांना लुटतात. असंच काहीसं माझ्या बाबतीतही झालं आहे. सध्या माझ्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. पण या सगळ्या गोष्टी मला बाहेर आणायच्या आहेत आणि त्या मी आणेन”, असे तिने यावेळी म्हटले होते.
आणखी वाचा : “एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण

आता तिच्या या आरोपांवर प्रदीप खरेराने स्पष्टपणे भाष्य केलं आहे. प्रदीप खरेराने नुकतंच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

“आपण जे बघतो त्यावर कायमच विश्वास ठेवू नका. ते सर्व खरं असतं असं नाही. कारण मीठही कधी कधी साखरेप्रमाणे असल्याचा भास होतो”, असे प्रदीप खरेराने या कॅप्शनमध्ये म्हटले. त्याने त्याच्या या पोस्टवरुन अप्रत्यक्षरित्या मानसीच्या आरोपांना उत्तर दिले आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “त्यांनी मित्राचा बुरखा पांघरला आणि…” घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने पहिल्यांदाच सोडलं मौन

दरम्यान मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण त्यानंतर त्या दोघांनीही इन्स्टाग्रामवरून एकमेकांबरोबरचे फोटो डिलीट केले होते. त्यामुळे दोघांच्याही नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

अखेर ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मानसी नाईकने पहिल्यांदा मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं. “माझ्या घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.” असे तिने म्हटले होते.

Story img Loader