अश्विनी राहुल इंटरप्रायजेस या चित्रपट निर्मिती संस्थेच्या ‘एकता एक पॉवर’ या आगामी मराठी चित्रपटातून मानसी नाईक एका धमाकेदार आयटम साँगमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.


‘पंधरा तो हो गया सोलवा लग गया, आयी जवानी पटरी पे’ या गाण्यावर मानसी नाईकने नृत्य सादर केले आहे. रिक्षावाला या गाण्याने प्रसिद्धिस आलेली गायिका रेश्मा सोनावणेने हे गाणे गायले असून, याचे नृत्यदिग्दर्शन सिद्धेश पै याने केले आहे. या गाण्याचे चित्रीकरण नायगाव येथील आर.डी.एल स्टुडिओत करण्यात आले आहे.
दिग्दर्शक के.विलास यांच्या ‘एकता एक पॉवर’ या चित्रपटात राजेश शृंगारपुरे, स्मिता शेवाळे, मौसमी तोंडबळकर आणि विद्याधर जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader