शुट युअर विजन कॉटेस्ट’ मध्ये मानव भिंद्रा यांच्या ‘डोर’ या लघुपटाने बाजी मारली आहे. वरळी फेस्टिव्हल आणि पॉकेट फिल्मस यांच्यातर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. परिणती चोप्रा आणि नसिर खान यांनी डोर लघुपटात भूमिका साकारल्या असून परिणतीने या चित्रपटासाठी एक गाणेसुद्धा गायले आहे. पारितोषिक विजेता “डोर” हा लघुचित्रपटाची कथा आई आणि तिच्या मुलामधल्या वास्तववादी प्रेमावर आणि भावनिक बंधावर आधारलेली आहे. यापूर्वी ‘डोर’ चे दिग्दर्शक मानव भिंद्रा यांनी धर्मा प्रोडक्शनच्या अग्निपथ, अटॅक्स ऑन २६/११, राम गोपाल  वर्मांच्या ‘भूत रिटर्न्स’ आणि रोहन सिप्पी यांच्या ‘नौटंकी साला’ चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले होते. यावेळी विजेत्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

Story img Loader