राज कपूर दिग्दर्शित ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट २५ जुलै १९८५ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटातून अभिनेत्री मंदाकिनी प्रेक्षकांच्या भेटीला आली. डोळ्यांत वेगळीच चमक असणारी ही अभिनेत्री ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली. या चित्रपटातील तिचा साधाभोळा पण, तितकाच मादक अंदाज अनेकांची मनं जिंकून गेला. विशेष म्हणजे या चित्रपटातील मंदाकिनीचं एक गाण प्रचंड गाजलं. मात्र अनेकांनी त्यावर टीकादेखील केली.

‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातील ‘तुझे बुलाएँ ये मेरी’ हे गाणं त्याकाळी प्रचंड गाजलं होतं. या गाण्यामध्ये मंदाकिनीने अनेक बोल्ड सीन दिले असून धबधब्याखाली अंघोळ करतानाचा तिचा व्हिडीओ विशेष गाजला होता. या गाण्यानंतर त्याकाळी असे बोल्ड सीन देणारी अभिनेत्री म्हणून मंदाकिनीकडे पाहिलं जात होतं. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यु करणाऱ्या मंदाकिनीचा आलेख या चित्रपटानंतर प्रचंड उंचावला. मात्र त्यानंतर काही कारणांमुळे तिला चित्रपटसृष्टीतून काढता पाय घ्यावा लागला.

Nagpur, Thieves stole donation box Mahal,
साक्षात ‘विघ्नहर्ता’ मंडपात, तरीही चोरट्यांनी साधला डाव
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Traffic jam on Ghodbunder road thane
‘ठाणेकर’ होऊन रहाण्याच्या हौसेवर कोंडीचे विरजण
Victim Aryan Mishra
Aryan Mishra Murder: आर्यन मिश्राला गोरक्षकांनी गोळ्या झाडून मारलं; वडील म्हणाले, “आम्ही पंडित आहोत…”
Victim Aryan Mishra
Aryan Mishra Murder: गायीच्या तस्करीच्या संशयावरून गोरक्षकांनी केली १२वी च्या विद्यार्थ्याची हत्या; ३० किमीपर्यंत केला पाठलाग
Dombivli, local train passenger rescued
डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट-रूळाच्यामध्ये अडकलेली महिला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे बचावली
Will Nifty touch the high mark of 25500
‘निफ्टी’ २५,५०० च्या थराची दहीहंडी फोडणार का?
Pet dog owner, Dombivli, Samrat Chowk,
डोंबिवलीत सम्राट चौकात पाळीव श्वान मालकाची वडील-मुलाला ठार मारण्याची धमकी

चित्रपटांमुळे लोकप्रिय ठरलेल्या मंदाकिनीचं नाव मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी, कुथ्यात डॉन दाऊदशीही जोडलं गेलं होतं. दाऊद आणि मंदाकिनीचे प्रेमसंबंध होते अशी चर्चा होती. आम्ही केवळ मित्र आहोत, असं मंदाकिनीने सांगितलं होतं. मात्र दाऊदसोबत नाव जोडले जात असल्याच्या चर्चांना उधाण येताच मंदाकिनी एकाएकी चित्रपटसृष्टीपासून दूर गेली.