इराणी अभिनेत्री मंदाना करीमीनं काही दिवसांपूर्वीच कंगना रणौतचा रिअलिटी शो ‘लॉकअप’मध्ये स्वतःच्या खासगी आयुष्याबाबत काही धक्कादायक खुलासे केले होते. या शोमध्ये तिनं तिचं आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकाचं सीक्रेट रिलेशनशिप, त्यातून झालेली प्रेग्नंसी आणि मग अबॉर्शन याविषयी सांगितलं होतं. हा खुलासा झाल्यानंतर मंदाना खूपच चर्चेत आली होती. याच प्रकरणात आता प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपचं नाव जोडलं जात आहे. पण यावर मौन सोडत मंदाना करीमीनं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मंदाना करीमीनं शोमध्ये केलेल्या खुलाशावर सविस्तर भाष्य केलं. ती म्हणाली, ‘ते सर्व शोच्या फॉरमॅटमुळे मला सांगावं लागलं. त्यात कोणतीही मुभा नव्हती. मी कोणत्याही व्यक्तीचं नाव घेणार नाही. पण सर्वांना मी एक सांगू इच्छिते की ती व्यक्ती अनुराग कश्यप नाहीये.’ असं म्हणत मंदानानं अनुराग कश्यपशी तिचं नाव जोडलं जाण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

मंदाना पुढे म्हणाली, ‘अनुराग कश्यप बरीच वर्षं माझा चांगला मित्र होता आणि आजही आहे. मी मागच्या काही दिवसांमध्ये ज्या हेडलाइन्स पाहिल्यात त्या खूपच चुकीच्या आहेत. मी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगते की, या अतिशय चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. अनुरागचं नाव त्यात जोडलं जाणं दुर्दैवी आहे.’

दरम्यान मंदाना करीमीनं काही दिवसांपूर्वी कंगना रणौतच्या शो ‘लॉकअप’मध्ये स्वतःच्या खाजगी जीवनाबद्दल काही खुलासे केले होते. “गौरव गुप्तापासून विभक्त झाल्यानंतर माझं एका प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत सीक्रेट अफेअर होतं. त्यावेळी मी खूप स्ट्रगल करत होते आणि आम्ही दोघांनी प्रेग्नन्सी प्लान केली होती मात्र नंतर मी प्रेग्नंट राहिल्यानंतर मात्र त्यानं आपल्याला दुसरं मुल नको असल्याचं सांगितलं आणि मला अबॉर्शन करावं लागलं.” असं मंदानानं सांगितलं होतं.

Story img Loader