सध्या सोशल मीडियावर कंगना रणौतच्या ‘लॉकअप’ शोची सर्वाधिक चर्चा आहे. या शोमध्ये मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळे धक्कादायक खुलासे केले जात आहेत. नुकताच मंदाना करीमीनं स्वतःचं सर्वात धक्कादायक गुपित शेअर केलं. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. मंदानाचं हे गुपित ऐकल्यावर कंगनासोबत अनेकांना धक्का बसला आहे.
‘लॉकअप’ शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यात मंदाना करीमी रडत रडत कंगनासमोर आपलं धक्कादायक सत्य सांगितलं. या प्रोमोमध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी मंदाना सर्वात आधी बझर वाजवताना दिसत आहे. त्यानंतर तिनं जे सांगितलं ते ऐकल्यावर सर्वजण अवाक झाले.
आणखी वाचा- लेक न्यासा कधी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? अजय देवगणनं दिलं उत्तर
मंदाना म्हणाली, ‘माझा घटस्फोट झाल्यानंतर मी एका प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत रिलेशनशिपमध्ये होते. तो असा काळ होता की मी खूप स्ट्रगल करत होते. मी प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत नात्यात होते. जो नेहमीच महिलांच्या हक्कांसाठी बोलतो आणि अनेक लोकांसाठी तो प्रेरणा आहे. आम्ही दोघांनी बाळाचा विचारही केला होता. पण मग नंतर सर्वच बिघडलं…’ एवढं सांगून मंदाना ढसाढसा रडू लागली. एवढंच नाही तर कंगना देखील हे ऐकल्यानंतर भावुक होताना दिसते.
आणखी वाचा- “मी अशाप्रकारचे चित्रपट…” सोनू निगमनं सांगितलं ‘द कश्मीर फाइल्स’ न पाहण्याचं कारण
दरम्यान २०१७ मध्ये मंदाना करीमीनं बिझनेसमन गौरव गुप्तासोबत लग्न केलं होतं. पण त्यांचं लग्न वर्षभर देखील टिकलं नाही. अवघ्या ५ महिन्यांतच या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मंदानानं गौरव गुप्तावर कौटुंबीक हिंसाचाराचा आरोप केला होता. अगोदर लग्न आणि नंतर अशाप्रकारच्या नात्यात विश्वासघात झाल्यानंतर ती खचली मात्र तेवढ्याच ताकदीनं पुन्हा खंबीरपणे उभी देखील राहिली.