शब्द जुळले म्हणजे कविता येत नाही, आणि कवितेला शब्दांनी बांधता देखील येत नाही. त्यासाठी लागतात काव्यात्मक विचार… ! आणि हे विचार जर चार कवींचे असतील तर त्यातून फुलणाऱ्या कवितांना सुगंध तर येणारच! अशा या काव्यात्मक सुंगंधात रंगून जाण्याची नामी संधी नववर्षांच्या निमित्ताने श्रोत्यांना लाभली आहे. मंदार चोळकर, प्राजक्त देशमुख, समीर सामंत आणि तेजस रानडे या आजच्या तरुण पिढीतल्या चार वेगवेगळ्या बाजाचे कवी स्वत:चे नाद गंध रुप ढंग घेऊन रसिकांना अविस्मरणीय काव्यानुभवाची सफर घडवण्यास येत आहेत. समीर सामंत आणि मंदार चोळकर या दोन कवींनी मराठी सिनेसृष्टीला अनेक चांगली गीते दिली आहेत. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘यार ईलाही’, ‘दिल कि तपीश, ‘अरुणी किराणी’ अशी उत्कृष्ट गीते समीर सामंत यांनी दिली. ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ हे दुनियादारी सिनेमातलं गाणं असो किंवा ‘नात्याला काही नाव नसावे’ हे ‘मितवा’ सिनेमातलं गाणं असो मंदार चोळकर यांच्या प्रत्येक गीतांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा