आज सकाळी मंदिरा बेदी यांचे पती राज कौशल यांचं निधन झालं. ह्दयविकाराचा झटक्याने राज कौशल यांचं निधन झालं. अभिनेत्री मंदिरा बेदी आणि राज कौशल यांचं लव्ह मॅरेज झालं होतं आणि ते कायम एकमेकांसोबतच दिसून येत होते. पतीच्या जाण्याने मंदिरा अगदी कोलमडून गेली आहे. अभिनेत्री मंदिरा बेदी हिने राज कौशल यांच्या अंतिम क्षणी सुद्धा त्यांची साथ सोडली नाही. अनेक वर्षांच्या परंपरेला छेद देत अभिनेत्री मंदिरा बेदी हिने तिच्या पतीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी पतीला अखेरचा निरोप देताना ती स्वतःला सावरू शकली नाही आणि हुंदके देत तिला रडू कोसळलं.
पतीचे अंत्यसंस्कार करत असतानाचे मंदिरा बेदीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये पतीच्या जाण्याने ती मनाने तुटून गेलेली दिसून येतेय. एक व्हिडीओ पाहून अभिनेत्री मंदिरा बेदीच्या धाडसाला नेटकरी सलाम करत आहेत. या व्हिडीओमध्ये मंदिरा बेदीच्या पतीचं पार्थिव एका रूग्णवाहिकेमधून स्मशानभूमीकडे नेण्यात येत असल्याचं दिसून येतंय. ती पूर्णवेळ डोळे भरुन राजकडे पाहात होती आणि रडत होती. याच दरम्यान इतर लोकांसोबतच मंदिरा बेदीनं आपल्या पतीचं पार्थिव उचललं आहे. ज्या पतीसोबत आयुष्यभराची स्वप्न पाहिली होती, त्याचं पार्थिव उचलताना मंदिराची खूप वाईट अवस्था झाली होती. तिला ढसाढसा रडताना पाहून तिचा मित्र रोनित रॉय तिला सावरण्यासाठी पुढे येतो. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. इतक्या मोठ्या दुःख क्षणामधून मंदिरा कशी जात असेल, याची कल्पना देखील करता येत नाही.
View this post on Instagram
रोनित रॉयच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली मंदिरा
मंदिराची अवस्था पाहून तिला सावरण्यासाठी रोनित रॉय पुढे येताना पाहून ती रोनित रॉयच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली. गेल्या रविवारी रात्रीच राज कौशल यांनी मंदिरा आणि रोनित रॉय यांच्यासोबत पार्टी केली होती. या पार्टीचे काही फोटोज सुद्धा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. रविवारची रात्र आनंदाने घालवल्यानंतर आज बुधवारी असा दुःखाचा डोंगर कोसळला.

1999 मध्ये मंदिरा आणि राज यांनी बांधली होती लग्नगाठ
कित्येक वर्षांच्या डेटिंग नंतर अभिनेत्री मंदिरा बेदी आणि राज कौशल यांनी १९९९ मध्ये लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मंदिराने गेल्याच वर्षी एका मुलीला दत्तक घेतलं होतं. तिच्या घरात येण्याने मंदिराचं कुटुंब परिपूर्ण झालं होतं. त्यावेळी संपुर्ण कुटुंबासोबत तिने एक फोटो क्लिक करून तो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता.