लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. गौतमी एका कार्यक्रमात कपडे बदलत असताना चोरून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आणि तो व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता. या संपूर्ण प्रकरणावर लोककलाकार मंगला बनसोडे-करवडीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकार निंदनीय असल्याचं त्या म्हणाल्या.

गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची महिला आयोगानं घेतली दखल; रुपाली चाकणकर ट्वीट करत म्हणाल्या…

arbaz flirt with jahnavi watch nikki tamboli reaction
Video : “जान्हवी तुझे डोळे किती सुंदर आहेत”, अरबाज ‘ते’ विधान ऐकताच निक्की म्हणाली, “बाई मी खूप…”
Vikrant Massey film 'The Sabarmati Report new release date
विक्रांत मॅस्सीच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ला अखेर मिळाली रिलीज…
Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant wears a saree watch video
Video: अभिजीत सावंतला साडी नेसवून केला भन्नाट मेकअप, अरबाज म्हणाला, “छम्मक छल्लो”
Tumbbad re release Box Office collection
पुन्हा प्रदर्शित झाल्यावर ‘तुंबाड’ची जबरदस्त कमाई, ६ वर्षांपूर्वीच्या मूळ कलेक्शनला टाकलं मागे
tharala tar mag pratima regain her voice
ठरलं तर मग : प्रतिमाची वाचा परत आली! लेकीसाठी पूर्णा आजीला अश्रू अनावर, तर प्रिया घाबरून…; पाहा मालिकेचा भावुक प्रोमो
Sana Khan husband Mufti Anas Sayed is seven years younger than her
धर्मासाठी बॉलीवूड सोडणाऱ्या सना खानचा पती तिच्यापेक्षा ‘इतक्या’ वर्षांनी लहान; म्हणाली, “लग्नानंतरचे ६ महिने मी…”
bigg boss marathi pandharinath kamble angry on varsha usgaonker
“Strategy त्यांच्याबरोबर करणार आणि आम्ही…”, पंढरीनाथने वर्षा उसगांवकरांना थेट विचारला जाब, नेटकरी म्हणाले, “भाऊ मस्तच…”
daughter in law Smita Deo told the reason why Seema Dev quit acting
…म्हणून सीमा देव यांनी अभिनय करणं सोडलं होतं, सूनबाई स्मिता देव यांनी सांगितलं कारण
Dhruvi Patel Miss India Worldwide 2024
Dhruvi Patel : अमेरिकेतील भारतीय वंशाची ध्रुवी पटेल ठरली मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४, पाहा Photos

“गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल झाला, हे ऐकून फार वाईट वाटलं. माझं मन नाराज झालं आहे. हा महाराष्ट्र जिजाऊंचा आहे, रमाबाईंचा आहे, हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा आहे. याच महाराष्ट्रात एका स्त्रीची विटंबना होते, हे चुकीचं आहे. गौतमी पाटील एक स्त्री आहे. स्त्रीनंतर ती कलावंत आहे, याचा विचार केला पाहिजे. कपडे काढतानाचे व्हिडीओ काढून ते व्हायरल करणं चुकीचं आहे. ती कलावंत जरी असली तरी आणि तिने याआधी चुका केल्या असल्या तरी तिने त्याबद्दल माफी मागितली आहे. पण आता सारखी सारखी ज्या पद्धतीने स्त्री जातीची विटंबना होत आहे, हे पाहून फार वाईट वाटतं,” असं मंगला बनसोडे-करवडीकर ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हणाल्या.

लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित, कार्यक्रमात वस्त्रे बदलत असताना मोबाईलवर केली तयार

महिला कलावंतांचा असा व्हिडीओ काढून तो व्हायरल करणं निंदनीय आहे. महाराष्ट्रामध्ये महिला कलावंतांची हेटाळणी का केली जाते? असा संतप्त सवालही यावेळी मंगला बनसोडे-करवडीकर यांनी केला. दरम्यान, कलाकार गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी कपडे बदलत असताना मोबाइलवरून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पोलिकांकडून तपास केला जात आहे.