लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. गौतमी एका कार्यक्रमात कपडे बदलत असताना चोरून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आणि तो व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता. या संपूर्ण प्रकरणावर लोककलाकार मंगला बनसोडे-करवडीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकार निंदनीय असल्याचं त्या म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची महिला आयोगानं घेतली दखल; रुपाली चाकणकर ट्वीट करत म्हणाल्या…

“गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल झाला, हे ऐकून फार वाईट वाटलं. माझं मन नाराज झालं आहे. हा महाराष्ट्र जिजाऊंचा आहे, रमाबाईंचा आहे, हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा आहे. याच महाराष्ट्रात एका स्त्रीची विटंबना होते, हे चुकीचं आहे. गौतमी पाटील एक स्त्री आहे. स्त्रीनंतर ती कलावंत आहे, याचा विचार केला पाहिजे. कपडे काढतानाचे व्हिडीओ काढून ते व्हायरल करणं चुकीचं आहे. ती कलावंत जरी असली तरी आणि तिने याआधी चुका केल्या असल्या तरी तिने त्याबद्दल माफी मागितली आहे. पण आता सारखी सारखी ज्या पद्धतीने स्त्री जातीची विटंबना होत आहे, हे पाहून फार वाईट वाटतं,” असं मंगला बनसोडे-करवडीकर ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हणाल्या.

लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित, कार्यक्रमात वस्त्रे बदलत असताना मोबाईलवर केली तयार

महिला कलावंतांचा असा व्हिडीओ काढून तो व्हायरल करणं निंदनीय आहे. महाराष्ट्रामध्ये महिला कलावंतांची हेटाळणी का केली जाते? असा संतप्त सवालही यावेळी मंगला बनसोडे-करवडीकर यांनी केला. दरम्यान, कलाकार गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी कपडे बदलत असताना मोबाइलवरून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पोलिकांकडून तपास केला जात आहे.