१९५१ साली भगवान दादा यांच्या ‘अलबेला’ चित्रपटातील ‘शोला जो भडके’ या गाण्याने लोकांवर मोहिनी घातली होती. आज ६५ वर्षांनी या गाण्याची जादू रसिकांना पुन्हा अनुभवता आली. भगवान दादांचे रुपेरी आयुष्य पडद्यावर पुन्हा जिवंत करणारा ‘एक अलबेला’ हा शेखर सरतांडेल दिग्दर्शित चित्रपट सध्या प्रत्येकाच्या तोंडी चर्चेचा विषय ठरला आहे. या मराठमोळ्या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलीवुडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालन गीता बाली यांच्या भूमिकेत तेही मराठी चित्रपटात दिसणार आहे. विद्याबरोबर मंगेश देसाई याने भगवानदादा म्हणून चित्रपटात रंग भरले आहेत. या दोघांनीही ‘शोला जो भडके’ या गाण्याच्या प्रकाशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या गाण्यावर ठेका धरला. हा चित्रपट मराठीत एक वेगळा प्रयोग ठरणार आहे.
भगवान दादांचे रुपेरी आयुष्य पडद्यावर पुन्हा जिवंत करणारा ‘एक अलबेला’
१९५१ साली भगवान दादा यांच्या ‘अलबेला’ चित्रपटातील ‘शोला जो भडके’ या गाण्याने लोकांवर मोहिनी घातली होती.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 05-06-2016 at 01:25 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangesh desai as bhagwan dada and vidya balan as geeta bali look promising